Join us

लग्नानंतरच्या पहिल्या होळी सणाला एकटी पडली दीपिका पादुकोण, 'हे'आहे त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:56 IST

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासाठी या वर्षीची होळी खास असणार आहे. त्याचे कारण, ही त्यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे.

ठळक मुद्देदीपिका 'छपाक'च्या शूटिंगसाठी मुंबईहुन दिल्लीला रवाना होणार आहेसिनेमाच्या निमित्ताने दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासाठी या वर्षीची होळी खास असणार आहे. त्याचे कारण, ही त्यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे. रिपोर्टनुसार रणवीरला ही होळी एकट्यानेच सेलिब्रेट करावी लागणार आहे. दीपिका तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये होळीत बिझी असणार आहे. त्यामुळे होळीचे सेलिब्रेशन करण्यासाठी रणवीरसोबत दीपिका नसणार आहे. 

दीपिका 'छपाक'च्या शूटिंगसाठी मुंबईहुन दिल्लीला रवाना होणार आहे. मेघना गुलजार 'छपाक' सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. या सिनेमात ती अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष पडद्यावर दाखवणार आहे. 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

काही दिवसांपूर्वीच लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला. दीपिकाने या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी दीपिकाचे आई-वडिल शिवाय पती रणवीर सिंग हाही तिच्यासोबत होता. या अनावरणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ दीपिकाने शेअर केले आहेत. दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण यांची प्रतिक्रिया विचाराल तर लेकीचा हा पुतळा पाहून त्या गदगद झालेल्या दिसल्या. ३५ वर्षांपूर्वी लंडनच्या मादाम तुसाद संग्रहालयाला आम्ही भेट दिली होती. ३५ वर्षांनंतर याच जगप्रसिद्ध संग्रहालयात माझ्या मुलीचा पुतळा असेल, ही कल्पनाही मी केली नव्हती, असे त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग