शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर आहे. गेल्या वर्षी शाहरुखचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. सध्या शाहरुख आपल्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतोय. एवढेच नाही तर शाहरुखने एका दिवसापूर्वी घरातील लायब्ररीची देखील साफ-सफाई केली. शाहरुखने सोशल मीडियावर फोटो शेअर करत पर्सनल लायब्ररी साफ केल्याचे सांगितले यावर दीपिका पादुकोणने रात्री 1 वाजून 20 मिनिटांने रिट्वीट केले. दीपिकाने रिट्वीट करत म्हटले आहे, की तू मला फोन फोन करणार होतास. साफ-सफाई करण्याच्या नादात शाहरुख त्याच्या मैत्रिणीला फोन करायचे कदाचित विसरुन गेला असावा. आता दोघांमध्ये नक्की कोणत्या सिनेमाला घेऊन चर्चा होणार होती हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 11:48 IST