Join us

"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:43 IST

दीपिकाने सिनेमात अभिनेत्रींना मिळणाऱ्या भूमिकांवर भाष्य केलं आहे.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सिनेजगतातील सर्वात आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री आहे. तिने प्रत्येक सिनेमातून तिचं वेगळेपण दाखवलं आहे. 'पिकू', 'ये जवानी है दिवानी' सारखे सिनेमे असो किंवा 'पठाण','कल्की' सारखे अॅक्शन सिनेमे असो तिने प्रत्येक भूमिकेतून छाप पाडली. आता नुकतंच दीपिकाने सिनेमात अभिनेत्रींना मिळणाऱ्या भूमिकांवर भाष्य केलं आहे. आता अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुली नसल्याचं तिने म्हटलं आहे.

लेकीच्या जन्मानंतर दीपिकाने पहिल्यांदाच फोटोशूट केलं. यावेळी ती म्हणाली,"मी काम सुरु केलं तेव्हाच्या भूमिका आणि आजच्या भूमिकांमध्ये खूप फरक आहे. वेगवेगळ्या भूमिका आता समोर येत आहेत. आधी अभिनेत्री म्हणजे केवळ शोभेच्या बाहुल्या म्हणून होत्या, त्यांना थोडी कॉमेडी करण्याची संधी दिली जायची. आज अभिनेत्रींच्या भूमिकांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो. त्यांचा वेगळा आवाज आहे जो बदल घडवून आणणारा आहे."

मी हा बदल माझ्या करियरमध्ये पाहिला आहे. मी याचा भाग राहिले आहे. भारतीय सिनेमाच्या मुख्य अभिनेत्री मोठा प्रवास करुन इथपर्यंत पोहोचल्या आहेत. बऱ्याच दशकांनंतर हा बदल झाला आहे. मी जे निवडते त्यापासून लोक प्रभावित होतात याची मला जाणीव आहे."

दीपिकाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 'दुआ'ला जन्म दिला. लेकीच्या जन्माआधी ती 'कल्कि' आणि 'सिंघम अगेन' सिनेमांमध्ये दिसली. आता ती प्रभाससोबत आगामी 'स्पिरिट' सिनेमात दिसणार आहे. यासाठी तिने तब्बल २० कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड