Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणने सुरु केलं मुंबईत 'छपाक'चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 06:00 IST

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिल्लीत छपाकचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर आता मुंबईतल्या दुसऱ्या शेड्यूल सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेयदीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिल्लीत छपाकचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर आता मुंबईतल्या दुसऱ्या शेड्यूल सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. या सिनेमाची कथा ऐकून दीपिका काहीशी भावूक झाली होती. 'छपाक' सिनेमा दीपिकाची भूमिका प्रचंड आव्हानात्मक असून सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. यात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते. या सिनेमात तिच्या भूमिकेचे नाव मालती आहे. दीपिकाला या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी जवळजवळ तीन-चार तास लागतात आणि पुन्हा हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो.

छपाक'च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते. या फोटो आणि व्हिडीओमध्ये दीपिका लक्ष्मी सारखीच हुबेहुब दिसत होती.  

दिल्लीतील शूटिंग दरम्यान दीपिका लक्ष्मीसोबत लंच डेटवर सुद्धा गेली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका आणि मेघना गुलजार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाक