Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपरहिट चित्रपट देणा-या या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो, ओळखा कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:34 IST

बॉलिवूड सेलिब्रिटी सर्रास स्वत:चे लहानपणीचे फोटो शेअर करतात. अशाच एका अभिनेत्री आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. 

ठळक मुद्दे सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी सर्रास स्वत:चे लहानपणीचे फोटो शेअर करतात. आपल्या आवडत्या कलाकारांचे हे फोटो पाहून चाहतेही सुखावतात. अशाच एका अभिनेत्री आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. फोटोतील ही अभिनेत्री कोण हे तुम्ही ओळखलेत? तर ही दुसरीतिसरी कुणी नसून दीपिका पादुकोण आहे. होय, चिमुकली दीपिक या फोटोत कमालीची क्यूट दिसतेस. दीपिकाने एक नाही तर दोन फोटो शेअर केलेत. या फोटोत दीपिकाला ओळखणे कठीण आहे.

यापूर्वीही दीपिकाने अनेकदा बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. पण हा फोटो पाहून चाहते एकदम क्रेझी झालेत.  चाहत्यांनीही त्यावर क्यूट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दीपिकाचा पती रणवीर सिंग यांनेही या फोटोवर प्रतिक्रिया दिली. त्याने या फोटोवर स्माईली इमोजी पोस्ट केला.

 दीपिका आणि निमार्ता मधू मंटेना मिळून लवकरच महाभारतावर आधारित चित्रपट मालिकांची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची कथा लिहिली जाणार आहे. याच एका अटीवर दीपिकाने द्रौपदीचे पात्र साकारण्यास होकार दिला आहे. महाभारतावर आधारित हा चित्रपट दोन वा अधिक भागात प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. 

 सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. लक्ष्मी अग्रवाल या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे.   या सिनेमात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘83’या सिनेमात ती पती रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण