Join us  

'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई...'फायटर' प्रमोशनवेळी दीपिका पदुकोणने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 3:21 PM

'पठाण', 'जवान' अशा हिट सिनेमांनंतर ती हृतिक रोशनसोबत 'फायटर' मध्ये झळकत आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'पठाण', 'जवान' अशा हिट सिनेमांनंतर ती हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) 'फायटर' मध्ये झळकत आहे. यामध्ये दीपिका पायलट आहे. दीपकाने नुकतंच सिनेमाचा अनुभव आणि वैयक्तिक आयुष्यातील तिची सर्वात कठीण लढाई कोणती याचा खुलासा केला आहे.

मागील वर्ष दीपिकासाठी खूपच दमदार होतं. आता 'फायटर' सिनेमाही सुपरहिट व्हावा असा दबाव वाटत होता का? यावर दीपिका म्हणाली, 'अजिबातच नाही. बॉक्सऑफिसचे नंबर्स डोळ्यासमोर ठेवून सिनेमा बनत नाही. सिनेमाचा उद्देश, कंटेंट आणि स्टोरी या गोष्टी पाहूनच मी निवड करते. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आणि नंतर सगळं प्रेक्षकांच्या हातात असतं. मागचं वर्ष नक्कीच माझ्यासाठी चांगलं होतं आणि मला आशा आहे फायटरही तितकंच यश मिळवेल. आम्ही सिनेमा अतिशय प्रेम आणि प्रामाणिक भावनेने बनवला आहे.

दीपिका पुढे म्हणाली,'माझ्या आजुबाजुला असणारे सर्वच लढाऊ आहेत. म्हणूनच कदाचित मी वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. मी मुंबईत आले तेव्हा कोणालाच ओळखत नव्हते. मी झीरोपासून सुरुवात केली आहे आणि चुकांमधून शिकले आहे. एका अनोळखी शहरात स्वत:ची ओळख बनवण्यापर्यंत, मला वाटतं मी स्वत: एक फायटर आहे. 

वैयक्तिक आयुष्यातील सर्वात कठीण लढाई 

आपल्या सर्वांनाच आयुष्यात आव्हानांचा सामना करावा लागतो. स्वत:साठी लढावं लागतं. वैयक्तिक स्वरुपात मी 2014 साली मानसिक आजाराचा सामना केला. तेव्हापासून प्रत्येक दिवस ही लढाई आहे. यामुळे माझ्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. 

टॅग्स :दीपिका पादुकोणमानसिक आरोग्यलढाऊ विमानसिनेमा