अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशीपबद्दल सर्वांनाच माहित आहे. या दोघांचे किस्से आजही लोकांच्या लक्षात आहेत. ही बाब सर्वांनाच माहित आहे की दीपिका रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असताना तिने रणबीरच्या नावाचा टॅटू मानेवर काढला होता. तिच्या मानेवर आरके असा टॅटू होता. हा टॅटू तिने रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असताना बनवला होता.
दीपिका नुकतीच अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नबेडीत अडकली आहे. दीपिका रणवीर सिंगसोबत बंगळुरूला होणाऱ्या रिसेप्शनसाठी जातानाचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दीपिकाच्या मानेवरील टॅटू नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दीपिकाचा हा टॅटू तेव्हा आणि आजही चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दीपिकाच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. या प्रतिक्रियावरून समजते की दीपिकाचे चाहते तिने टॅटू काढून टाकल्यामुळे खूप खूश आहेत.