Join us  

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने दत्तक घेतले मुल, मुलाचा पहा क्यूट Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 8:18 PM

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न झाले आणि आता ते दोघे एका मुलाचे पालक झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या दीपिका पादुकोणसोबत लंडनमध्ये आहे आणि तिथे त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले आहे. या दोघांचा तिथला एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात दीपिका पादुकोण म्हणतेय की, आम्ही लक्ष देतो की हा डिनर करेल, व्यवस्थित झोपेल, नाश्ता करेल आणि लू करेल. 

खरेतर दीपिका व रणवीर अडॉप्टेड पॅरेन्ट्स बनले आहेत. ज्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले आहे. तो तुमच्या चांगलाच परिचयाचा आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडमधील अभिनेता वरूण धवन आहे. वरूण धवनदेखील सध्या लंडनमध्ये असून त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात रणवीर व दीपिकादेखील दिसत आहेत. या व्हिडिओत वरूण धवन बोलत आहे की, लंडनमध्ये मी अडॉप्ट केलेल्या पालकांसोबत आहे आणि ते माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत. त्यावर दीपिका म्हणतेय की, आम्ही लक्ष देतो की हा डिनर करेल, व्यवस्थित झोपेल, नाश्ता करेल आणि लू करेल. 

वरूण कलंक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लंडनमध्ये रवाना झाला. तिथे त्याला रणवीर व दीपिका भेटले आणि त्यांनी हा फनी व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण