Join us  

Video: परदेशात शॉपिंग करताना दिसले 'दीपवीर', इथेही दीपिकाने पकडला नाही रणवीरचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 1:15 PM

या व्हिडिओवरुनही त्यांना ट्रोल करण्यात येतंय.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh)हे बॉलिवूडमधील एक पॉवर कपल आहे. दोघांमध्ये अनेकदा काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा असतात. तर कधी दोघंही हातात हात घालून फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वी दोघांनी 'कॉफी विद करण' मध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडनंतर या जोडीला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं होतं. आता त्यांचा परदेशात शॉपिंग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओवरुनही त्यांना ट्रोल करण्यात येतंय.

दीपिका रणवीर बेल्जियममध्ये फिरण्याचा आनंद घेत होते. एका मॉलमध्ये दोघंही शॉपिंग करताना दिसले. एका चाहत्याने त्यांचा मॉलमधील व्हिडिओ कॅप्चर केला आहे. तसंच मॉलमधून बाहेर पडल्यानंतरचीही क्लिप व्हिडिओमध्ये आहे. बाहेरस पडल्यानंतर रणवीर हात पुढे करतो मात्र दीपिका दोन्ही हात मागे बांधून चालताना दिसते. इथेही ती त्याचा हात पकडत नाही हे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कपलचा हा व्हिडिओ नोव्हेंबरमधला आहे. 5 तारखेला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. हे पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीही काही इव्हेंटमध्ये दीपिकाने रणवीर हात पकडत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.  दोघंही आपलं वैयक्तिक आयुष्य खूप सिक्रेट ठेवतात. त्यांचे फारसे फोटोही ते शेअर करत नाहीत. चाहत्यांना त्यांचा हा साधेपणा भावतो. मात्र कधी कधी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्याही चर्चा होतात. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही ते बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. 

दीपिकाचा नुकताच 'फायटर' सिनेमा रिलीज झालाय. यातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तर रणवीर सिंहने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सुपरहिट सिनेमा दिला. तो लवकरच 'डॉन' ही आयकॉनिक भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगसोशल मीडियाट्रोलबॉलिवूड