Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट! रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 12:19 IST

बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. काल दीपिका व रणवीर स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी लग्नाचे निमंत्रण घेऊन पोहोचलेत.

बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. काल दीपिका व रणवीर स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी लग्नाचे निमंत्रण घेऊन पोहोचलेत. संजय लीला भन्साळी हे दीपवीरचे सगळ्यांत आवडते दिग्दर्शक आहेत. भन्साळी यांनीच दीपिका-रणवीरला त्यांच्या करिअरमधील तीन यशस्वी चित्रपट दिलेत.

बाजीराव-मस्तानी, रामलीला आणि पद्मावत या तिन्ही चित्रपटांनी दीपिका व रणवीरला वेगळी ओळख दिली. यापैकी ‘रामलीला’च्याच सेटवर दीपिका व रणवीरचे प्रेम बहरले. त्यामुळे दोघेही भन्साळींना जातीने निमंत्रण द्यायला पोहोचलेत. हे निमंत्रण पाहून भन्साळीही गदगद झालेत. यामुळे त्यांनी रणवीर व दीपिकाला खास भेट दिली. ही भेट काय हे जाणून घ्यायला तुम्हीही उत्सूक असाल.

तर ही खास भेट होती एक अल्बम. होय,‘पद्मावत’दरम्यान काढलेल्या फोटोंचा अल्बम भन्साळींनी दीपवीरला भेट दिला. भन्साळींच्या घरातून  दीपिका बाहेर पडली, त्यावेळी तिच्या हातात हा ‘पद्मावत’च्या पोस्टरने सजलेला हा अल्बम होता. 

रोहित शेट्टीने दिल्या खास शुभेच्छा

दिग्दर्शक रोहित शेट्टीने दीप-वीर यांना लग्नाच्या खास शुभेच्छा दिल्यात.  रणवीर रोहितच्या ‘सिम्बा’मध्ये दिसणार आहे.रणवीरने ‘सिम्बा’चे शूटिंग पूर्ण करताच रोहित शेट्टीने एक भावूक पोस्ट लिहिली.  रोहितने लिहिले, ‘६ जून २०१८ ला मी ‘सिम्बा’चा प्रवास सुरू केला होता आणि हा प्रवास जेव्हा संपत आला तेव्हा मी भावूक झालो. ‘सिम्बा’म्हणजे संग्राम भालेराव, माझा आणि रणवीरचा पहिला चित्रपट आहे. आमचा प्रवास मनोरंजक होता. मी आनंदी आहे, की माझी भेट इतक्या चांगल्या माणसासोबत घडलीण आतापर्यंतचा माझा हा बेस्ट चित्रपट आहे. रणवीरसारखा चांगला माणूस आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करतोय. आज मी मनापासून सांगू इच्छितो की, माझा ‘सिम्बा’, माझी ‘मीनम्मा’ लग्न बंधनात अडकणार आहे. दोघे नेहमी आनंदी राहा’. दीपिकाने रोहितच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये काम केले होते. यात तिने ‘मीनम्मा’ साकारली होती.

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंगसंजय लीला भन्साळीरोहित शेट्टी