Join us

दीपिका पादुकोण लवकरच करणार लग्न, दीपिकाने स्वत: दिली लग्नाची हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 11:20 IST

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दोघांच्या रिलेशनशीपचे किस्से आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ठळक मुद्देदीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेतदोघांचे लग्न याचवर्षी 20 नोव्हेंबरला इटलीमध्ये होऊ शकते

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दोघांच्या रिलेशनशीपचे किस्से आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नोव्हेंबरमध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे कळतेय. यावर दीपिका आणि रणवीरने अधिकृत वक्तव्य केलेले नाही.  नुकताच एका इंटरव्हु दरम्यान दीपिका लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर तिने मौन बाळगणं पसंत केले. तिला जेव्हा तिच्या भविष्यातील प्लॉन बदल विचारण्यात आले यावर ती म्हणाली तुम्हाला लवकरच कळेल ते. त्यामुळे दीपिकाचा हा इशारा तिच्या लग्नावर नव्हताना. गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका काही नवीन प्रोजेक्ट साईन करत नाहीय.  

रिपोर्टनुसार दीपिकाला आपल्या लग्नाची तारीख सुरक्षित ठेवायची आहे ज्यामुळे ती नवे काही प्रोजेक्ट साईन करत नाहीय. रणवीरबदल बोलायचे झाले तर तो सध्या सिनेमाचे शूटिंग करतोय. 

 रिपोर्टनुसार दोघांचे लग्न याचवर्षी 20 नोव्हेंबरला इटलीमध्ये होऊ शकते. लग्नासाठी या कपलने इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डी नावाचे ठिकाण सिलेक्ट केले आहे. बीच हॉलिडेसाठी याला बेस्ट डेस्टिनेशन म्हटले जाते. लेक कोमो हे इटली येथील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव 1300 फूट खोल आणि 146 स्क्वेअर किलोमीटर लांब आहे.रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. पहिले दोघांच्या लग्नाची तारीख 10 नोब्हेंबर ठरवण्यात आली होती.  यानंतर 20 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली.  दीपिका सध्या कोणताही नवा प्रोजक्ट हातात घेत नाही आहे. दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी कधीच पब्लिकली आपले रिलेशन स्वीकारले नाही. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग