Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् दीपिकाचे नवे फोटो पाहून युजर्सला आठवली कियारा, अशी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 15:51 IST

नुकतेच दीपिकाने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पण हे काय, हे फोटो पाहिल्यावर लोकांनी तिची मजा घेणे सुरु केले.

ठळक मुद्देदीपिका सध्या ‘छपाक’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

बॉलिवूडची सर्वाधिक स्टाईलिश अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधील अनेक क्षण ती चाहत्यांशी शेअर करते. नुकतेच दीपिकाने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पण हे काय, हे फोटो पाहिल्यावर लोकांनी तिची मजा घेणे सुरु केले.

या फोटोत दीपिका काहीशा फंकी लूकमध्ये दिसतेय.   ब्लॅक कलरचा टॉप आणि ब्ल्यू जीन्स असा तिचा अवतार आहे. या फोटोतील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे, तिचा बेल्ट. होय, फोटोत दीपिकाने अगदी तळपायापर्यंत लोंबणारा बेल्ट घातला आहे. खरे तर दीपिकाचा लूक कूल आहे. पण काही युजर्सचे लक्ष तिच्या लूककडे नाही तर दीपिकाच्या बेल्टकडे गेले. मग काय, यापैकी अनेकांनी यावरून तिची मजा घेणे सुरु केले.

एका युजरला तर दीपिकाचा बेल्ट पाहून कियारा अडवाणीचा बेल्ट आठवला. त्यामुळेच कियारा की बेल्ट ले आई क्या? असा प्रश्न विचारत या युजरने दीपिकाला ट्रोल केले.

होय, काही दिवसांपूर्वी कियारानेही असाच लांब बेल्ट कॅरी केला होता. याचे फोटोही तिने शेअर केले होते.दीपिका सध्या ‘छपाक’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकाने प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. या लुकसाठी दीपिकाला तासन तास मेकअप करावा लागत असे.

टॅग्स :दीपिका पादुकोण