Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत दीपिका पादुकोणने पटकावला लोकप्रिय अभिनेत्रीचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 15:51 IST

दीपिका पादुकोणने स्कोर ट्रेड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टवर विक्रम केला आहे. बॉलिवूडच्या ह्या पद्मावती राणीने  2017-2018 ह्या आर्थिक वर्षात 14 ...

दीपिका पादुकोणने स्कोर ट्रेड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टवर विक्रम केला आहे. बॉलिवूडच्या ह्या पद्मावती राणीने  2017-2018 ह्या आर्थिक वर्षात 14 आठवडे सर्वोच्च स्थानावर राहून बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान मिळवला आहे तसेच सुपरस्टार सलमान खानही 17 आठवडे सर्वाधिक लोकप्रिय राहून गेल्या आर्थिक वर्षातला नंबर वन लोकप्रिय अभिनेता झाला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, 2017-18 ह्या आर्थिक वर्षात दीपिका पदुकोण आपल्या पद्मावत चित्रपटामूळे सतत चर्चेत राहिली. तसेच, अभिनेता रणवीर सिंह सोबत असलेली तिची खास मैत्रीही तिला सोशल नेटवर्किंग साइट्स आणि मीडियामध्ये चर्चेत ठेवत होती. त्यामूळेच 58.22 गुणांसह 14 आठवडे सतत नंबर वन राहिलेली दीपिका गेल्या आर्थिक वर्षातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधल्या 600 बातम्यांच्या स्रोताव्दारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, हा डेटा मिळतो." दीपिकाच्याशिवाय बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन स्थानी असलेला सलमान खान बिग बॉस आणि टाइगर जिंदा है चित्रपटामूळे गेल्या आर्थिक वर्षतले 17 आठवडे लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी झालेली त्याच्या रेस3 चित्रपटाची घोषणा आणि फस्ट लूक ह्यामूळे त्याच्याविषयी मीडियात भरपूर चर्चा होती. लवकरच सुरू होणा-या दस का दम च्या नव्या पर्वामूळे ही सल्लुमियाँ लोकप्रिय स्टार्समध्ये सतत राहिला. आणि ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला, तो म्हणजे 68.3 ह्या अद्भूत गुणांसह दबंग खान स्कोर ट्रेड्सच्या चार्टवर 2017-18 मधला सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड सुपरस्टार असल्याचं सिध्द झालंय.अश्वनी ह्याविषयी सांगतात, " फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लेटफार्मे्स तसेच, वायरल आणि डिजिटल बातम्या आणि प्रिंट माध्यम अशा निरनिराळ्या स्त्रोतांच्या सहाय्याने हा डेटा एकत्र केला जातो. ज्यामूळे बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत आम्ही पोहोचू शकतो."