Join us

मैत्रिणीच्या लग्नात धमाल केल्यानंतर आजारी पडली बी-टाऊनची ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 17:02 IST

लवकरच ती आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे.

दीपिका पादुकोणची मैत्रिण उर्वशी केशवानीची लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नात दीपिका आणि रणवीरने खूप धमाल केली. मात्र आता दीपिका आजारी पडली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत दीपिकाने लिहिले आहे की, 'जेव्हा तुम्ही तुमच्या खास मैत्रिणीच्या लग्नात जास्त मस्ती करता.' दीपिका या फोटोत खूपच थकलेली दिसतेय.   

येत्या 14 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. दोघांनी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थिती इटलीतल्या लेक कोमोमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.  

रणवीर आणि दीपिकाने पहिल्यांदा संजय लीला भन्साळींच्या 'गोलिंयो की रासलीला रामलीला' सिनेमा एकत्र काम केले. यात सिनेमात दोघांची मुख्य भूमिका होती. याच सिनेमाच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले.  

रणवीरने सांगितले, ''या सिनेमातील एक गाण्यावर नाचताना पाहिले आणि त्याचक्षणी तो तिच्याप्रेमात पडला.''  यासिनेमानंतर या कपलच्या लव्हलाईफ चर्चेत आली. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग 83 सिनेमात एकत्र दिसणार आहे. यार दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग