Join us

दीपिका पादुकोण चाखणार का ‘इमली’ची चव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 15:30 IST

गतवर्षी कंगना राणौतने अनुराग बासूचा ‘इमली’ हा चित्रपट साईन केला होता. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाला आणि कंगनाचा ‘इमली’तील इंटरेस्ट संपला. मग काय, कंगनाने या चित्रपटातून अचानक अंग काढून घेतले.

ठळक मुद्देसध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिची भूमिका साकारताना दिसेल.

गतवर्षी कंगना राणौतने अनुराग बासूचा ‘इमली’ हा चित्रपट साईन केला होता. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाला आणि कंगनाचा ‘इमली’तील इंटरेस्ट संपला. मग काय, कंगनाने या चित्रपटातून अचानक अंग काढून घेतले. आता कंगनाने चित्रपट सोडला म्हटल्यावर नव्या हिरोईनचा शोध आलाच. ताजी बातमी खरी मानाल तर हा शोध दीपिका पादुकोण जवळ येऊन थांबलाय. होय, बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘इमली’च्या मेकर्सनी दीपिकाशी संपर्क साधला आहे  दीपिकाला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडल्याचे कळतेय. अर्थात अद्याप तिने हा चित्रपट साईन केलेला नाही.

कंगनाने अनुरागसोबतच करिअरची सुरुवात केली होती. २००६ मध्ये अनुराग बासू दिग्दर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यामुळे कंगना व अनुराग यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. याच बॉन्डिंगमुळे वा मैत्रीमुळे म्हणा, अनुरागच्या ‘इमली’ या चित्रपटात काम करण्यास कंगनाने होकार दिला होता.

या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा, कंगना  खूश होती. अनुरागसोबत पुन्हा काम करण्यास मी प्रचंड उत्सुक आहे, असे बरेच काही ती म्हणाली होती. पण लवकरच कंगना आपल्या स्वत:च्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. हा चित्रपट स्वत: कंगना दिग्दर्शित करतेय. साहजिकच ‘इमली’साठी तिच्याजवळ वेळ नव्हता. त्यामुळे मेकर्सनी दीपिकाशी संपर्क साधला. आता दीपिका हा चित्रपट साईन करते की नकार देते, ते बघूच.सध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिची भूमिका साकारताना दिसेल. रणवीर सिंगसोबत लग्न केल्यानंतरचा दीपिकाचा हा पहिला चित्रपट असणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणकंगना राणौत