दीपिका पादुकोण बॉलिवूडची ‘ए’ लिस्टर्स अॅक्ट्रेस आहे. दीपिकाने अपार मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण हीच दीपिका ख-या आयुष्यात कशी आहे? हे जाणून घ्यायला उत्सूक असणा-या चाहत्यांना दीपिकाची बेस्ट फ्रेन्ड स्रेहा रामचंदर हिने एक मोठे सरप्राईज दिले आहे. होय, फ्रेन्डशिप डे आधी स्रेहाने दीपिकाबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. त्या वाचून एक वेगळी दीपिका तुम्हाला भेटले.
स्नेहाने दीपिकाच्या वेबसाईटवर ही नोट शेअर केली आहे. ‘दीपिका अशी एक व्यक्ति आहे, जिच्यासोबत मी तासन् तास गप्पा मारू शकते. तिच्या डोळ्यांत केवळ प्रेम दिसते. यावरून ती तुम्हाला किती जपते, हे कळते. ती माझ्यासाठी हॉटेलमधील शॅम्पूच्या छोट्या छोट्या बॉटल चोरायची. ती जेव्हाकेव्हा फिरायला जायची, तेव्हा तेव्हा असे करायची. कारण मला या बॉटल आवडतात, हे तिला ठाऊक होते. दीपिकावर मी जीवापाड प्रेम करते. मी नशीबवान आहे की, तू माझ्यासोबत आहेस, असे स्रेहाने लिहिले आहे.
दीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.