Join us

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:08 IST

Deepika Padukone And Ranveer Singh : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपवत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. यासोबतच या जोडप्याने मुलीच्या नावाचाही खुलासा केलाय.

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे बॉलिवूडमधील चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही ८ सप्टेंबर रोजी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांसोबत बाळाची एक झलक शेअर केली आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलीचा एक अतिशय गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तिचे नावही सांगितले.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये या जोडप्याच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी तिचे छोटे पाय खूपच गोंडस दिसत आहेत. फोटोमध्ये या कपलची लाडकी आई दीपिकाच्या मांडीवर आहे. या दोघांनीही लाल रंगाचा सूट परिधान केला आहे.

लेकीचं ठेवलं हे नावदिवाळीनिमित्त त्यांच्या मुलीचा हा सुंदर फोटो शेअर करताना रणवीर-दीपिकाने तिच्या नावाचाही खुलासा केला. रणवीर-दीपिकाने त्यांच्या मुलीचे नाव दुआ पादुकोण सिंग ठेवले आहे. फोटो शेअर करताना जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दुआ पादुकोण सिंग, 'दुआ': म्हणजे प्रार्थना..कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे. आमचे अंतःकरण प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर'

आलिया भटने दिली ही प्रतिक्रिया आता दीपिका पादुकोणच्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या पोस्टला काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. युजर्ससोबतच सेलेब्सही या फोटोवर कमेंट करत आहेत. दीपिकाची बेस्टी आलिया भटनेही यावर कमेंट केलीय आणि अनेक रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसत आहेत. जो १ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग