पुन्हा एकदा जमणार दीपिका पादुकोण आणि इरफान खानची जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 13:52 IST
दीपिका पादुकोण आणि इरफान खानच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 'पीकू'नंतर दीपिका आणि इरफानची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. ...
पुन्हा एकदा जमणार दीपिका पादुकोण आणि इरफान खानची जोडी!
दीपिका पादुकोण आणि इरफान खानच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 'पीकू'नंतर दीपिका आणि इरफानची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. विशाल भारव्दाज आणि क्रिअर्ज एंटरटेनमेंट मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. एक वृत्तपत्राच्या माहिती नुसार दीपिका यात एका लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. जिचे नाव राहिमा खान उर्फ सपना दीदी असते.राहिमा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन बनवते. कारण तिला दाऊदकडून आपल्या नवऱ्याच्या हत्येचा बदला घ्यायचा असतो. विशाल भारव्दाज यांच्या चित्रपटांचे आशय नेहमीच वेगळे असतात. त्यांनी आतपर्यंत बॉलिवूडला अनेक हटके चित्रपट दिले आहेत. बॉम्ब टाइम्सच्या वृत्तानुसार दीपिका आधी हनी बरोबर काम करण्यास तयार नव्हती कारण हा त्याचा पहिला चित्रपट आहे. मात्र चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर ती त्याच्यासोबत काम करायला तयार झाली. पद्मावतीच्या शूटिंग संपल्यावर ती या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. बॉम्ब टाईम्सशी बोलताना विशाल भारव्दाज म्हणाले, "दीपिकानेच मला अशा पद्धतीची स्क्रिप्ट लिहायला सांगितली होती. ज्याच्या केंद्रभागी स्त्री असेल. दीपिकाला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे याचा मला आनंद आहे तसेच ती हनीसोबत काम करायला सुद्धा तयार झाली आहे.'' याचे बरोबर ते पुढे म्हणाले,'' इरफान खान एक सशक्त अभिनेता आहे. या दोघांसोबत काम करायला मी खूपच उत्सुक आहे.''दीपिका सध्या संजय लीला भंसाली यांच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारते आहे. तसेच अल्लाउद्दीन खिलाजाच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे तर रवल रतन सिंग याच्या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार आहे. हा 17 नोव्हेंबर 2017ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.