Join us

‘दंगल’ फेम सान्या मल्होत्राच्या ‘या’ डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर धूम, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 21:29 IST

आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटात काम करणाºया सान्या मल्होत्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

२०१६ मध्ये ब्लॉकबस्टर ‘दंगल’ या चित्रपटात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली जात आहे. ‘दंगल’मधून सान्याने चांगलीच लोकप्रियता मिळविली. शिवाय तिच्या कामाचेही त्यावेळी कौतुक केले गेले. या चित्रपटाच्या यशामुळे सान्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करता आले. असो, सध्या सान्या सोशल मीडियावर चर्चेत असून, तिच्या एका डान्स व्हिडीओने एकच धूम उडवून दिली आहे. सान्या ‘दंगल’नंतर आतापर्यंत एकाही चित्रपटात बघावयास मिळाली नाही. मात्र अशातही ती कायम चर्चेत असते. कारण सान्या एक अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम कोरिओग्राफरही आहे. काही दिवसांपूर्वीच तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये ती फातिमा सना शेख हिच्यासोबत एका इंग्रजी गाण्यावर थिरकताना दिसत होती. आता पुन्हा एकदा तिने असाच काही व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती जबरदस्त ठुमके लावताना दिसत आहे.  सान्याने तिचा हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून, यूजर्स तिच्या डान्सचे कौतुक करीत आहेत. व्हिडीओमध्ये तिच्या अदा बघण्यासारख्या आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला १.१ लाख लोकांनी बघितले आहे. शिवाय तिचे कौतुकही केले जात आहे. वास्तविक सान्या एक ट्रेंड बॅले डान्सर आहे.  सान्या दिल्लीची रहिवासी आहे. मात्र अशातही तिने ‘दंगल’मध्ये बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती रातोरात लाइमलाइटमध्ये आली होती. असो, सान्या लवकरच एका चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘फोटोग्राफर’ असे असून, त्यास रितेश बत्रा दिग्दर्शित करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच सान्याने या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. त्याचबरोबर ती लवकरच आयुष्यमान खुराना याच्या अपोझिट आणखी एका चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चिपटाचे नाव ‘बधाई हो’ असे आहे.