‘दंगल’ दिग्दर्शक नितेश तिवारी आणि आमिर खान पुन्हा एकदा एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 10:56 IST
२०१६ हे वर्ष आमिर खानच्या नावे नोंदविले गेले. वर्षा-दोन वर्षातून केवळ एकच चित्रपट करणाऱ्या आमिरने ‘दंगल’द्वारे पुन्हा एकदा सिद्ध ...
‘दंगल’ दिग्दर्शक नितेश तिवारी आणि आमिर खान पुन्हा एकदा एकत्र?
२०१६ हे वर्ष आमिर खानच्या नावे नोंदविले गेले. वर्षा-दोन वर्षातून केवळ एकच चित्रपट करणाऱ्या आमिरने ‘दंगल’द्वारे पुन्हा एकदा सिद्ध केले की, खरा ‘मि. परफेक्शनिस्ट’ आहे. बॉलीवूडचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘दंगल’ने सर्वच्या सर्व बॉक्स आॅफिस रेकॉर्ड तोडले. याचे श्रेय जेवढे आमिरला जाते, तेवढेच दिग्दर्शक नितीश तिवारीलासुद्धा जाते.कुस्तीवर आधारित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणाऱ्या नितीशने आमिरला त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात बेस्ट रोल दिला. आता ’दंगल’च्या देदिप्यमान यशानंतर ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याची इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. आमिरला घेऊन नितीश आणखी एका चित्रपटाची निर्मिती करण्याची योजना बनवत आहे.दिग्दर्शकाच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशने त्याच्या पुढील चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू केलेले असून लवकरच ती पूर्ण करून तो आमिरला ऐकविणार आहे. आता आमिर तो करेल का नाही हे कोणीच सांगू शकत नाही. आमिर सध्या अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’च्या तयारीला लागला आहे. त्यामुळे किमान एक वर्ष तरी तो इतर कोणताच चित्रपट करणार नाही.►ALSO READ: दंगल ठरला सर्वाधिक पाहिलेला चित्रपटयेथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, मागच्या दहा वर्षांत आमिरने एका दिग्दर्शकासोबत काम केल्यावर पुन्हा त्या दिग्दर्शकाबरोबर काम केलेली नाही. अपवाद केवळ राजकुमार हिराणींचा आहे. त्यांच्यासोबत आमिरने ‘३ इडियट्स’ व ‘पीके’ हे दोन चित्रपट केले. फिल्म कितीही मोठी हीट होऊ दे, आमिर नेहमी वेगवेगळ्या दिग्दर्शकाबरोबरच काम करण्यास प्रधान्य देतो. त्यामुळे नितीशसोबत तो पुन्हा काम करेल का हा प्रश्न आहे.आता आमिर करेल किंवा न करेल, हे येणाऱ्या काळात कळेलच पण नितीशच्या आगामी चित्रपटाला रॉनी स्कु्रवाला, सिद्धार्थ रॉय कपूर आणि करण जोहर यासारखे मोठे निर्माते मिळालेले आहेत. नुकतेच एका मुलाखतीमध्ये नितीशने सांगितले की, माझा पुढचा चित्रपट हॉरर, थ्रीलर, रोमॅण्टिक, अॅक्शन असा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. ‘दंगल’ हीट झाला म्हणून मी आता तसेच चित्रपट बनवणार असे नाही. मला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवायचे आहेत. स्वत:ला एकाच चौकटीत बांधून ठेवायचे नाही.► ALSO READ: ‘दंगल’च्या दिग्दर्शकाचा पुढचा चित्रपट कोणता?