Join us  

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा भडकली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 8:12 PM

कंगना राणौत नेहमी तिच्या बिनधास्त वक्तव्याने चर्चेत येते. तिच्या अशा बिनधास्त वागण्याने सोशल मीडियावर अनेकजण तिला फॉलो करतात.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने फिल्म उद्योग आणि थिएटर्स व्यवसाय वाचवण्याची मागणी कंगनानं केली होती. ‘थलायवी’  (Thalaivii ) हा सिनेमा नुकताच देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झालाकुणालाही कलाकार, निर्माते, डिस्ट्रीब्यूटर्स आणि चित्रपटगृह मालकांची चिंता नाही

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत(Kangana Ranaut) हिनं पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या कंगनाचा अलीकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा थलाइवी खूप चर्चेत आहे. कंगनाच्या या सिनेमासाठी तामिळ आणि तेलुगु भाषेत थिएटर्स मिळाले परंतु हिंदी सिनेमासाठी अद्याप थिएटर्स उपलब्ध झाले नाहीत. ज्यामुळे कंगना राणौत चांगलीच भडकलेली आहे. कंगनाने मुंबईत चित्रपटगृह न उघडल्याने महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

कंगना राणौत नेहमी तिच्या बिनधास्त वक्तव्याने चर्चेत येते. तिच्या अशा बिनधास्त वागण्याने सोशल मीडियावर अनेकजण तिला फॉलो करतात. अशावेळी कंगना राणौतचा राग इन्स्टा हँडलवरुन व्यक्त केला. त्यावर नेटिझन्स कमेंट्स करत आहेत. या पोस्टमध्ये कंगनाने म्हटलंय की, महाराष्ट्र सरकार जोपर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये थिएटर कल्चर पूर्णपणे बंद होत नाही तोवर चित्रपट गृहांवर बंदी ठेवणार आहे असं तिने आरोप केला आहे.

याठिकाणी अनेक सिनेमा चित्रपटगृहांच्या प्रतिक्षेत आहेत. कुणालाही कलाकार, निर्माते, डिस्ट्रीब्यूटर्स आणि चित्रपटगृह मालकांची चिंता नाही. फिल्म इंडस्ट्रीबद्दल राज्य सरकार वेगळी वागणूक देत आहे. आता बॉलिवूडने मौन बाळगण्याचं धोरण अवलंबलेलं दिसतंय. कुणीही जगातील सर्वात बेस्ट सीएमला प्रश्न विचारु शकत नाही अशी वृत्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(Uddhav Thackeray) आहे असा आरोपही कंगना राणौतनं केला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना राणौतनं म्हटलं होतं की, कोविड रुग्णसंख्या कमी होत असताना महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत घट दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने फिल्म उद्योग आणि थिएटर्स व्यवसाय वाचवण्याची मागणी केली होती. त्यासाठी कंगनानं #OpenUpCinemas असं हॅशटॅग वापरला होता. कंगनानं त्या पोस्टमध्ये सांगितले की, महाराष्ट्रात रेस्टॉरंट, हॉटेल, कार्यालयं, लोकल ट्रेन्स सर्वकाही सुरळीत सुरू झालं परंतु कोविडमुळे थिएटर्स बंद आहेत. कोरोना केवळ महाराष्ट्रातील थिएटर्समध्येच पसरतो असा टोला कंगनाने सरकारला लगावला होता.

बॉक्स ऑफिसवर नाही चालली कंगनाच्या थलायवीची जादू

कंगना राणौतचा (kangana Ranaut) ‘थलायवी’  (Thalaivii ) हा सिनेमा नुकताच देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाकडे सुरूवातीपासून सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कंगनाचा सिनेमा म्हणून अपेक्षा होत्याच. शिवाय जयललितांच्या आयुष्यावरचा चित्रपट म्हटल्यावर अपेक्षा आणखीच वाढल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय कमाल दाखवतो, याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष होतं. सिनेमातील कंगनाच्या कामाचं भरभरून कौतुक झालं. पण बॉक्स ऑफिसचं म्हणालं (Thalaivii Box Office Collection) तर हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या दिवशीची कमाई तर कंगनाच्या या सिनेमाने अक्षय कुमारच्या ‘बेटबॉटम’पेक्षाही कमी गल्ला जमवला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकंगना राणौतउद्धव ठाकरेबॉलिवूड