Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कन्फर्म : ‘स्टुडंट आॅफ द इयर २’ येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 11:45 IST

चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘स्टुडंट आॅफ द इयर’ चित्रपटाचा सिक्वेल निघणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर सर्व ...

चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘स्टुडंट आॅफ द इयर’ चित्रपटाचा सिक्वेल निघणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत खुद्द करण जोहरने ट्विटरवर जाहीर केले की, ‘स्टुडंट आॅफ द इयर २’ येणार. आणि सोबत मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शकाचे नावदेखील घोषित केले.त्याने ट्विट केले की, ‘‘स्टुडंट आॅफ द इयर’चा सिक्वेल जरूर येणार आणि त्यामध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असेल तर पुनित मल्होत्रा दिग्दर्शन करणार आहे.’ या बातमीने चाहत्यांना एवढा आनंद झाला की, ट्विटरवर लगेच ‘#एसओटीवाय २’ हा हॅशटॅग ट्रेंडिंग होत होता.आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन या तिघांचे पदार्पण याच चित्रपटातून झाले होते. त्यामुळे सिक्वेलमधूनदेखील नव्या चेहºयांना संधी देण्यात येईल अशी अपेक्षा होती. पुनित मल्होत्राने यापूर्वी ‘आय हेट लव्ह स्टोरी’ आणि ‘गोरी तेरे प्यार में’ हे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत.