Join us  

इंदूरमध्ये बाईक चालवणं विकी कौशलला पडलं महागात, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 10:21 AM

Complaint against Vicky Kaushal : नवं वर्ष सुरू होत नाही तोच बॉलिवूड अभिनेता विकी कौशल कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. वाचा काय आहे प्रकरण  

नवं वर्ष सुरू होत नाही तोच बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)  कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. होय, मध्यप्रदेशात विकीविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील एका व्यक्तीने  चित्रपटात बनावट नंबर प्लेट असलेली बाईक वापरल्याबद्दल विकीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (Complaint against Vicky Kaushal)

सोशल मीडियावर अलीकडे विकीच्या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो समोर आलेत.  या फोटोंमध्ये  विकी कौशल इंदूरच्या रस्त्यावर सारासोबत बाईकवर फिरताना दिसत आहेत. तक्रारकर्त्याची नजर या फोटोंवर पडली आणि त्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.  जयसिंग यादव असं तक्रारकर्त्याचं नाव आहे. माझ्या मालकीची स्कूटी आणि ज्या बाईकवर विकी इंदूरच्या रस्त्यावर सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) फिरताना दिसला त्याचा नंबर एकच असल्याचा दावा जयसिंग यादव यांनी केला आहे. 

‘चित्रपटात वापरलेला वाहन क्रमांक माझ्या मालकीचा आहे. चित्रपटाच्या युनिटला याची माहिती आहे की नाही, मला ठाऊक नाही. पण माझ्या संमतीशिवाय माझ्या वाहनाचा नंबर ते वापरू शकत नाही. म्हणून मी याबाबतची तक्रार दिली आहे,’असे यादव यांनी सांगितलं.

पोलिसांनी अशी तक्रार आली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘आमच्याकडे याप्रकरणी तक्रार आली आहे.  नंबर प्लेटचा गैरवापर झाला की नाही ते पाहू. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई  करण्यात येईल. चित्रपटाचे युनिट इंदूरमध्ये असल्यास, त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करू,’ असे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनी यांनी स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात विकी व साराच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. विकीने पत्नी कतरिनासोबत  नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले आणि यानंतर लगेच तो इंदूरला रवाना झाला होता. कतरिना पतीला सोडण्यासाठी विमानतळावर पोहोचली. दोघेही एकाच गाडीतून विमानतळावर आले होते. कतरिनाने विकीला मिठी मारली, किस केले आणि त्यानंतर विकी गाडीतून खाली उतरला. याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॅग्स :विकी कौशलसारा अली खानबॉलिवूड