Join us
Daily Top 2Weekly Top 5

​किम शर्मा लग्नानंतर करतेय नवºयासोबत चिटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 22:15 IST

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माला चर्चेत राहणे चांगलेच याद आहे असेच म्हणावे लागेल. लग्नापूर्वी क्रिकेटर युवराज सिंग हिच्यासोबत डेटिंग करणारी ...

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माला चर्चेत राहणे चांगलेच याद आहे असेच म्हणावे लागेल. लग्नापूर्वी क्रिकेटर युवराज सिंग हिच्यासोबत डेटिंग करणारी किम शर्मा सध्या आपल्या पतीला सोडून दुसºया कुणातरी सोबत डेटिंग करीत असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये जोरात सुरू आहेत. या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहण्यात आल्याने या चर्चाना ऊत आला आहे.  एका संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, किम शर्मा सध्या मुंबईत असून ती फॅशन डिझायनर अर्जुन खन्ना याला डेट करीत आहे. बातम्यानुसार दोघांनाही अनेक ठिकाणी सोबत पाहण्यात आले आहे. यामुळे दोघांबद्दल चांलगीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडर लाँच प्रसंगी दोघेही आपल्याच विश्वात रममान होते असे अनेकांचे मत आहे. २०१० साली किम शर्माने केनिया येथील व्यवसायिक अली पुंजानी याच्या लग्न करून बॉलिवूडला रामराम ठोकला होता. तीन मुलांचा बाप असलेल्या अलीने किमसोबतच लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. किम व अली यांच्या वयात बरेच अंतर होते तरीही दोघांनी एकमेकांशी लग्न केले. सध्या अली व किम यांच्यात काहीच मंगल नसल्याचे सांगण्यात येते. यामुळेच ती मुंबईत परतली आहे. दुसरीकडे डिझायनर अर्जुन खन्ना याचा देखील शेफाली हिच्याशी विवाह झाला आहे. मात्र तो आपला जादा वेळ किमसोबत घालवित आहे. काही दिवसांपूर्वी किम आणि अर्जुन यांना एका बिच हाऊसवर एकत्र पाहण्यात आले. तर २१ जानेवारीला किमचा वाढदिवशी दोघेही गोव्याला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. किमचे नाव अनेक व्यक्तींशी जोडण्यात आले आहे. क्रिकेटर युवराज सिंग नंतर किम शर्मा स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला डेट करत होती. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले. आता पुन्हा तिचे नाव आणखी एका व्यक्तीशी जोडले जात असल्याने दोघांच्या चांगल्याच चर्चा आहेत.