'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या प्रचंड चर्चा आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. अखेर 'छावा' थिएटरमध्ये रिलीज झाला. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (akshaye khanna) पाहायला मिळतोय. 'छावा' सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. विकी कौशलच्या १० वर्षातील करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून 'छावा' सिनेमाला ओळखलं जातंय. जाणून घ्या प्रेक्षक-समीक्षकांच्या प्रतिक्रिया
'छावा' पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियासमीक्षक तरण आदर्श यांनी X वर रिव्ह्यू पब्लिश करुन 'छावा' सिनेमाला साडेचार स्टार्स दिले आहेत. "भावना, इतिहास, पराक्रम या सर्व गोष्टींना छावामध्ये चांगल्या पद्धतीने गुंफण्यात आलंय. लक्ष्मण उतेकर यांनी उत्कृष्ट स्टोरीटेलर म्हणून त्यांची जबाबदारी निभावली आहे. छावाने छत्रपती संभाजी महाराजांना उत्कृष्ट पद्धतीने मानवंदना दिली आहे. रश्मिका, विकी दोघांनी सुंदर अभिनय केलाय. अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत केलेला अभिनय प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील."
आणखी एका युजरने X वर लिहिलंय की, "छावा हा एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य अत्यंत हुशारीने रुपेरी पडद्यावर दाखवलं आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत भावनात्मत खोली दर्शवली आहे. अक्षय खन्नाचं औरंगजेबाच्या भूमिकेत झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहणं हा एक सुखद अनुभव. देहबोली, संवादफेकीवर अक्षयचं असलेलं प्रभुत्व वाखाणण्याजोगं आहे. युद्धाचे प्रसंग आपल्या काळजाचा ठोका चुकवतात."