'छावा' हा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांच्या आगामी सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यांचा पुढील प्रोजेक्टही इतिहासानाची पानं उलटताना दिसणार आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा आणि या संस्कृतीशी निगडित कला क्षेत्रातील एका मुख्य महिलेची भूमिका साकारताना अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सर्वांना दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि लक्ष्मण उतेकर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
'पिंकव्हिला'रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकरांच्या पुढील सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर शास्त्रीय नृ्त्यात पारंगत नृत्यांगनेची मुख्य भूमिका साकारणार आहे. सध्या तरी याचं टायटल ITA असं ठरवण्यात आलं आहे. या भूमिकेसाठी श्रद्धा जोरदार तयारीलाही लागली आहे. महाराष्ट्राच्या इतिसाहातील संस्कृतीचं दर्शन घडवणारी एक मोठी भूमिका ती साकारणार आहे. यातून ती भूमिका देशभरात, जगभरात पोहोचेल. मात्र ही भूमिका नक्की काय आणि हा सिनेमा नक्की कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे हे अजून समोर आलेले नाही. श्रद्धा या भूमिकेसाठी, नृत्यकौशल्य पारंगत करण्यासाठी विविध डान्स वर्कशॉप करत आहे. इतकंच नाही तर गायनाचेही धडे घेत आहे.
सिनेमा अत्यंत मोठ्या स्केलवर बनवण्यात येणार आहे. हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित असल्याचीही चर्चा आहे. ते नक्की काय हे अजून गुलदस्त्यात आहे. लक्ष्मण उतेकर मराठी संस्कृती भव्यरित्या पडद्यावर साकारतात हे सगळ्यांनी 'छावा'मधून पाहिलं. आता श्रद्धा कपूरच्या सिनेमाचं शूट नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. तर सिनेमा पुढील वर्षी रिलीज होईल असा अंदाज आहे. मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजान सिनेमाची निर्मिती करणार आहेत. मराठी इंडस्ट्रीतूनही काही कलाकारांची यामध्ये निवड होणार आहे.