Join us

‘चांद्रयान-2’ च्या अपयशाने बॉलिवूड झाले भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 13:34 IST

‘चांद्रयान-2’ चे चंद्रावर उतरण्याच्या काही वेळाअगोदरच लॅँडर विक्रमचा संपर्क तुटला आणि वैज्ञानिक निराश झाले. या घटनेमुळे सर्व स्तरावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही स्टार्सनेही सोशल मीडियाद्वारे भावनिक पोस्ट शेअर करत जणू वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढविला आहे.   

-रवींद्र मोरे ‘चांद्रयान-2’ च्या चंद्रावर उतरण्यावरुन सामान्यांपासून दिग्गजांपर्यंत जवळपास सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. सर्वचजण त्या वेळेची मोठ्या उत्कंठतेने वाट पाहत होते आणि त्या सुवर्ण क्षणाला आपल्या डोळ्यात कायमस्वरुपी कैद करु इच्छित होते. मात्र ‘चांद्रयान-2’ चे चंद्रावर उतरण्याच्या काही वेळाअगोदरच लॅँडर विक्रमचा संपर्क तुटला आणि वैज्ञानिक निराश झाले. या घटनेमुळे सर्व स्तरावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही स्टार्सनेही सोशल मीडियाद्वारे भावनिक पोस्ट शेअर करत जणू वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढविला आहे.   

* अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनीही भावूक होत कविताच्या काही ओळी लिहून लोकांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, तू ना थके गा कभी, तू ना मुड़े गा कभी, तू ना थमे गा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।' 

* लता मंगेशकर

लता मंगेशकर यांनीही ट्वीट केले असून त्यात लिहिले आहे की, फक्त संपर्क तुटला आहे, संकल्प नाही, आत्मविश्वास अजूनही दृढ आहे. मला विश्वास आहे की, यश नक्कीच मिळेल. संपूर्ण देश इस्त्रोच्या सोबत आहे. आमच्या वैज्ञानिकांवर आम्हाला गर्व आहे. फक्त निराश होऊ नका..!’ 

* अनुपम खेर

अनुपम खेर यांनीही ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले!!!' असे लिहून त्यांनी एकप्रकारे जणू सर्व वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढीस हातभार लावला आहे.  

* शाहरुख खानशाहरुखनेही ट्वीट केले असून त्यात लिहिले आहे की, कधी-कधी आपण आपल्या योग्य ठिकाणी पोहचू शकत नाही, जिथे पोहचायला हवे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपण नेहमी आशा आणि विश्वास कायम ठेवावा. इस्त्रोवर आम्हाला गर्व आहे.’  

* रितेश देशखुख 

रितेशने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, ‘आपण सर्वजण या घटनेतून नक्कीच बाहेर निघू, भविष्य त्यांचेच असते जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने कार्य करतात. इस्रोच्या संपूर्ण टीमवर आम्हाला गर्व आहे. जे काही आपण सिद्ध केले आहे, तीही काही लहान गोष्ट नाहीय.’ 

* करण जोहरकरणनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. करणने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, इस्त्रोच्या अविश्वसनीय प्रयत्नांना सॅल्यूट करतो. त्यांच्या कार्याचा आम्हाला गर्व आहे. खूपच गर्व वाटतोय  अशा राष्टÑाचा भाग होण्याचा ज्याच्याजवळ प्रतिभाशाली बुद्धिमत्ता आहे. ’ 

* सनी देओलसनी देओलनेही ट्वीट केले आहे, त्यात ‘संपर्क तुटला आहे, विश्वास नाही. आम्हाला इस्त्रोवर गर्व आहे. 

टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनलता मंगेशकररितेश देशमुखअनुपम खेरशाहरुख खान