Join us

'फरदीन-फिरोज खानसोबत शारिरीक संबंध...' पाकिस्तानी पत्रकाराच्या आरोपावर अभिनेत्रीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 11:51 IST

अभिनेत्रीने खुलासा करत सांगितले आहे की परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान हाय कमिशनसह हा मुद्दा उचलून धरला आहे

अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) एकेकाळी बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय होता. त्याच्यावर अनेक तरुणी फिदा होत्या. फरदीन खान प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान (Firoz Khan) यांचा मुलगा आहे. तर तेव्हा फरदीन आणि अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नाही तर सेलिनाचे फिरोज खान आणि फरदीन खान या दोघांसोबत शारिरीक संबंध होते असा दावा एका पाकिस्तानी पत्रकाराने केला होता. आता सेलिनाने खुलासा करत सांगितले आहे की परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान हाय कमिशनसह हा मुद्दा उचलून धरला आहे आणि चौकशीची मागणी केली आहे. सेलिनाने ट्वीटरवर एक मोठी नोट शेअर करत अर्जाचा फोटोही पोस्ट केला आहे.

यावर्षीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानी पत्रकार उमैर संधूने एका ट्वीटमध्ये लिहिले, 'सेलिना जेटली बॉलिवूडची एकमेव अशी अभिनेत्री आहे जिचे फिरोज खान आणि त्यांचा मुलगा फरदीन खान या दोघांसोबत शारिरीक संबंध होते.' सेलिनाने या ट्वीटला सडेतोड उत्तर दिलं आणि तिला अनेक लोकांचा पाठिंबाही मिळाला. दिवंगत अभिनेते फिरोज खानने सेलिनाला आपल्या होम प्रोडक्शन 'जानशीन' मध्ये मुलगा फरदीन खानसोबत ब्रेक दिला. हा सिनेमा 2003 मध्ये रिलीज झाला.

सेलिनाने काल या मुद्द्यावर लिहिले, 'काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी पत्रकार उमैर संधूने ट्वीटरवर माझ्याबद्दल खोटे आणि भयानक आरोप केले. ज्यात माझे गुरु फिरोज खान आणि फरदीन खान दोघांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे ते आरोप होते. यासोबतच त्याने ऑस्ट्रियामध्येही माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेवर निशाणा साधत अनेक दावे केले. त्यांनी केलेल्या खोट्या दाव्यांवर माझी प्रतिक्रिया व्हायरल होत आहे आणि पाकिस्तानी लोकांसोबतच लाखो ट्वीटर युझर्सचा मला पाठिंबा मिळाला. पत्रकाराला यामुळे धक्का बसला.'

सेलिनाने हा मुद्दा राष्ट्रीय महिला आयोगाकडे नेण्याचा निर्णय घेतला. आयोगाने तिच्या तक्रारीवर विचार करुन परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिवांना पत्र पाठवलं. मंत्रालयाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे.

पाकिस्तानाकडून पूर्ण पाठिंबा

सेलिनाने शेअर करत हे देखील लिहिले की,'माझी लढाई फक्त माझ्या चारित्र्यावर संशय घेतला ही नव्हे तर माझ्या कुटुंबावर आणि गॉडफादर फिरोज खान जे आता या जगात नाहीत त्यांनाही बदनाम केल्याप्रकरणी आहे.' सेलिनाने आयोगाचेही आभार मानलेत.

टॅग्स :सेलिना जेटलीफरदीन खानफिरोज खानबॉलिवूडसोशल मीडिया