Join us
Daily Top 2Weekly Top 5

सल्लूमियाँच्या एक्सगर्लफ्रेंडने सेलिब्रेट केले ‘सुल्तान’ चे यश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 10:01 IST

सध्या एकाच चित्रपटाची चर्चा संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीत सुरू आहे. ती म्हणजे सुपरस्टार सलमान खानच्या ‘सुल्तान’ चित्रपटाची. सलमानचा आगामी चित्रपट ...

सध्या एकाच चित्रपटाची चर्चा संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीत सुरू आहे. ती म्हणजे सुपरस्टार सलमान खानच्या ‘सुल्तान’ चित्रपटाची. सलमानचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ मध्ये त्याचा अभिनय, चाहत्यांचा त्याच्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता सर्वत्र सेलिब्रेशन टाईम सुरू आहे.नुकतेच सल्लूमियाँची एक्स गर्लफ्रेंड कॅटरीना कैफ हिने ‘सुल्तान’ ला मिळणाºया प्रतिसाद पाहून सेलिब्रेशन केले. या पार्टीत कॅटरिना कैफ, कबीर खान, मिनी माथूर हे होते. मिनीने सोशल मीडियावर फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ सेलिब्रेटरी नाईट आऊट विथ माय फ्रेंड्स.’आपण जरी तिला सल्लूमियाँची एक्स गर्लफ्रेंड म्हणत असलो तरीही ती मात्र सलमानवर अजूनही प्रेम करते असे दिसतेय. वेल, सल्लूमियाँवर कोण प्रेम करत नाही मग ?