Join us

Cans 2018 : मल्लिका शेरावतचा रेड कार्पेटवरील लूक पाहून तुम्ही रहाल दंग; पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 13:59 IST

अभिनेत्री मल्लिका शेरावत ही कायम तिच्या बाबतीतील हॉट बातम्यांनी कायम चर्चेत असते. आता ती ‘कान्स फेस्टिव्हल २०१८’ च्या निमित्ताने ...

अभिनेत्री मल्लिका शेरावत ही कायम तिच्या बाबतीतील हॉट बातम्यांनी कायम चर्चेत असते. आता ती ‘कान्स फेस्टिव्हल २०१८’ च्या निमित्ताने चर्चेत आली आहे. तिचा कान्स सोहळयातील लूक नुकताच व्हायरल झाला आहे. तिचे हे फोटो म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी एक ट्रीटच ठरणार आहे. तिने गुलाबी रंगाचा लाँग घातला असून ती तिच्या नजरेने पापाराझींसह चाहत्यांनाही घायाळ करताना दिसत आहे. या फोटोतील तिचा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस अंदाज पाहून भल्याभल्यांना घाम फुटणार हे मात्र नक्की. बॉलिवूडच्या अभिनेत्री कान्स सोहळयाला जाण्यासाठी कायम उत्सुक असतात. सोनम कपूर, करिना कपूर खान, ऐश्वर्या रॉय बच्चन, दीपिका पादुकोण यांच्यासह अख्खं बॉलिवूड तिथे रेड कार्पेटवर त्यांच्या फॅशनचा जलवा सादर करताना दिसतं. आत्तापर्यंत दीपिका पादुकोण, ऐश्वर्या रॉय बच्चन, कंगणा राणौत यांनी त्यांचे कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. आता त्यात मल्लिका शेरावत हिचे देखील नाव सामील झाले आहे. तिचा हा रेड कार्पेटवरील अंदाज नक्कीच सर्वांना घायाळ करणार याबद्दल खात्री वाटते.