Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिकिनी फोटो शेअर करणाऱ्या ब्रूना अब्दुल्लाहवर नेटिझन्सचा हल्लाबोल !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:44 IST

फॅशन इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट मॉडेल ब्रूना अब्दुल्लाह तिच्या हॉट फोटोशूटमुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. ब्रूनाने काही दिवसांपूर्वीच बिकिनीमध्ये फोटोशूट ...

फॅशन इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट मॉडेल ब्रूना अब्दुल्लाह तिच्या हॉट फोटोशूटमुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. ब्रूनाने काही दिवसांपूर्वीच बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते. त्यातील काही फोटोज् तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. मात्र फोटो शेअर करणे तिला चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. कारण नेटिझन्सला तिचे हे हॉट बिकिनी फोटो फारसे पसंत आले नसल्याने तिचा त्यांच्याकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. काही नेटकºयांनी तिच्या या फोटोंना अक्षरश: शिव्या दिल्या आहेत. काहींनी तर तिला कपडे कसे घालायला हवेत याबाबतचा सल्लाही दिला आहे.  ब्रूनानने आतापर्यंत ‘हेट लवस्टोरी’, ‘देसी बॉईज’ आणि ‘ग्रॅण्ड मस्ती’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु ती तिच्या चित्रपटांपेक्षा मॉडेलिंग क्षेत्रामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. ती नियमितपणे तिचे हॉट सिजलिंग फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. परंतु यावेळेस तिने शेअर केलेले फोटो लोकांना फारसे पसंत पडले नसावेत असेच दिसत आहे. परंतु लोकांच्या या कॉमेण्ट आणि संतापाचा ब्रूनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नसताना दिसत आहे. ती लोकांच्या या कॉमेण्टकडे फारसे लक्ष न देता सातत्याने बिकिनी आणि न्यूड अवतारातील फोटोज् तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करीत आहे. बूनाचे इन्स्टाग्राम अकाउंट तर तिच्या बिकिनी फोटोंनी अक्षरश: तुडुंब भरलेले आहे. ब्रूना चित्रपटांव्यतिरिक्त  ‘खतरों के खिलाडी, नच बलिए-६ आणि कॉमेडी क्लासेस’ यासारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील झळकलेली आहे. बू्रनाने २००७ मध्ये आलेल्या ‘कॅश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ब्रूना ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील ‘सुबह होने ना दे’ यासारख्या सुपरहिट गाण्यातही झळकली आहे. या गाण्यामुळे ब्रूनाला चांगलीच लोकप्रियता मिळालेली आहे. कारण या आयटम सॉँगनंतरच तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.