Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं ब्रेकअप?, आता 'हे' फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 14:41 IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर सुरूवातीपासून त्यांच्या अफेयरमुळे चर्चेत येत असतात. त्या दोघांच्या नात्याबद्दल चाहत्यांपासून पापाराझीपर्यंत सर्वांनाच इंटरेस्ट आहे. अशात मलायका आणि अर्जुनची कोणतीही अपडेट समोर आली की त्याची चर्चा होणारच. काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, मलायका आणि अर्जुनमध्ये सर्वकाही ठीक नाही. दोघे लवकरच वेगळे होणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुन दोघे ख्रिसमस आणि न्यू ईअरदेखील साजरा करणार नाहीत. मात्र आता दोघांच्या ब्रेकअपच्या वृत्तांना पूर्णविराम लागला आहे. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. आता दोघांनी फोटो शेअर करत त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. फोटोमध्ये ते दोघे मालदीवच्या एका रिसॉर्ट आणि बीचवर एन्जॉय करताना दिसत आहेत.

फोटोमध्ये अर्जुन कपूर व्ह्यू एन्जॉय करताना दिसत आहे. मलायका अरोरा उन्हातील ऊबची मजा घेत पोझ देताना दिसत आहे आणि तिने हे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

या फोटोतून समजते आहे की, हे कपल एकत्र आहे आणि खूशदेखील आहे. दोघे मालदीवमधील बीचचा आनंद लुटत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.

मलायका आणि अर्जुन भलेही त्यांच्या नात्याबद्दल फार कमी बोलताना दिसतात. मात्र दोघे सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा