Join us
Daily Top 2Weekly Top 5

अथिया शेट्टीच्या बर्थ डेला बॉयफ्रेंड केएल राहुलने फोटो शेअर करत, लिहिला हा खास मेसेज

By गीतांजली | Updated: November 6, 2020 13:05 IST

राहुलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

सुनील शेट्टीची मुलगी अथिया 5 नोव्हेंबरला आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. तिचा बर्थ डे  आणखी खास बनवले तो तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटर केएल राहुलने. राहुलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, कॅप्शनमध्ये लिहिले, हॅप्पी बर्थडे मॅड चाइल्ड. फोटोमध्ये अथिया राहुलच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसते आहे.

 थायलंडमध्ये वेळ एकत्र घालवला होतारिपोर्टनुसार अथिया आणि राहुलची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. हे दोघेही गेल्या वर्षी थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते.दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.   या दोघांना अनेकवेळा सोबत पाहिलं गेलं. शिवाय ही दोघं एकमेकांच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स-कमेंट्स करत असतात. अथिया व केएल यांपैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिलेली नाही. 

अथियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर तिने  2015मध्ये निखिल आडवाणीच्या 'हीरो' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला, हा सिनेमा 1983 साली आलेल्या सुभाष घई यांच्या 'हीरो' अधिकृत रिमेक होता.अथियाच्या अपोझिट यात सूरज पंचोली मुख्य भूमिकेत होता. यानंतर अथिया कॉमेडी सिनेमा 'मुबारकां'मध्ये दिसली होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. 'नवाबजादे' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमे देखील तिचे फ्लॉप झाले. 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल