Join us

Box Office : उर्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी-४’ने पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 15:49 IST

आपल्या हॉटनेसमुळे प्रचंड चर्चेत आलेल्या उर्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी-४’ला प्रेक्षकांनी मात्र सपशेल नाकारल्याचे दिसत आहे. जबरदस्त बोल्ड सीन्स देऊनही ...

आपल्या हॉटनेसमुळे प्रचंड चर्चेत आलेल्या उर्वशी रौतेलाच्या ‘हेट स्टोरी-४’ला प्रेक्षकांनी मात्र सपशेल नाकारल्याचे दिसत आहे. जबरदस्त बोल्ड सीन्स देऊनही चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स आॅफिसवर केवळ ३.७६ कोटी रुपयांचाच गल्ला जमविला. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून याबाबतची माहिती देताना लिहिले की, ‘शुक्रवारी ३.७६ कोटी रुपयांची कमाई. सकाळच्या शोकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरविली असली तरी इव्हिनिंग शोमध्ये मात्र सिनेमागृहात काहीशी गर्दी बघावयास मिळाली. दरम्यान, ‘हेट स्टोरी-४’ या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देण्यात आले असून, चित्रपटाचे एकूण बजेट २० कोटी रुपये आहे. ‘हेट स्टोरी’ सिरीजचे आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली आहे. मात्र उर्वशीच्या ‘हेट स्टोरी-४’ची सुरुवात ज्या पद्धतीने झाली त्यावरून चित्रपट किती कोटींपर्यंत मजल मारू शकेल? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, उर्वशीने चित्रपटात जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. तिने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत केल्याचेही दिसून येते. आपल्या डान्स आणि अदा परफेक्ट बनविण्यासाठी ती स्ट्रिप क्लबलादेखील पोहोचली होती. परंतु अशातही प्रेक्षकांनी तिला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही.  वास्तविक दिग्दर्शक विशाल पांड्या हेदेखील उर्वशीच्या मेहनतीमुळे खूप इम्प्रेस आहेत. त्यांनी म्हटले की, उर्वशीने घेतलेली मेहनत ‘आशिक बनाया आपने’ या गाण्यातून स्पष्टपणे दिसून येते. ‘हेट स्टोरी-४’मध्ये उर्वशी व्यतिरिक्त करण वाही, विवान भटेना, इहाना ढिल्लो आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला टी-सिरीजने प्रोड्यूस केले आहे.