अभिनेता वरुण धवन सध्या 'बॉर्डर २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच प्रमोशनचा एक भाग म्हणून वरुननं मुंबई मेट्रोतून प्रवास केला. मात्र, या प्रवासादरम्यान त्याने मेट्रोच्या हँडलला लटकून 'पुल-अप्स' केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई मेट्रोने वरुणला कडक शब्दात समज देत अशा कृत्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
वरुण धवन त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेट्रोने प्रवास करत होता. एका व्हायरल व्हिडीओमध्ये तो धावत्या मेट्रोतील हँडलला पकडून पुल-अप्स करताना दिसला. यावर मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने आक्षेप घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. मेट्रो प्रशासनाने लिहिले, "महा मुंबई मेट्रोमध्ये असे करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या अॅक्शन चित्रपटांप्रमाणे या व्हिडीओसोबतही डिस्क्लेमर असायला हवा होता. मेट्रोतील हँडल हे प्रवाशांच्या आधारासाठी आहेत, त्यावर लटकण्यासाठी नाहीत".
प्रशासनाने पुढे इशारा दिला की, "अशी कृत्ये मेट्रो रेल्वे कायदा २००२ अंतर्गत दंडनीय आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे किंवा प्रवाशांना त्रास देणे या गुन्ह्यासाठी दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे जबाबदारीने प्रवास करा".
'बॉर्डर २'ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाईदरम्यान, वरुणचा 'बॉर्डर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट आहे. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा मिळाल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Web Summary : Varun Dhawan faced backlash after a video surfaced of him performing pull-ups on Mumbai Metro handles during film promotion. Mumbai Metro authorities warned of legal action for endangering passengers and damaging property. His film, 'Border 2', is performing well at the box office.
Web Summary : फिल्म प्रमोशन के दौरान मुंबई मेट्रो के हैंडल पर पुल-अप्स करने के वीडियो के बाद वरुण धवन को आलोचना का सामना करना पड़ा। मुंबई मेट्रो अधिकारियों ने यात्रियों को खतरे में डालने और संपत्ति को नुकसान पहुंचाने के लिए कानूनी कार्रवाई की चेतावनी दी। उनकी फिल्म 'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस पर अच्छा प्रदर्शन कर रही है।