Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोनी कपूर यांना सतावू लागली लेक जान्हवी कपूरच्या भविष्याची चिंता...!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 11:00 IST

बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. जान्हवीचा हा चित्रपट प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला. पण याऊपरही जान्हवीचे पापा बोनी कपूर यांना मुलीच्या करिअरची चिंता सतावताना दिसतेय. ताज्या बातमीवरून तरी हेच दिसतेय.

ठळक मुद्देजान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या ती ईशान खट्टरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली. येत्या काळात जान्हवी धर्मा प्रॉडक्शनच

बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. जान्हवीचा हा चित्रपट प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला. पण याऊपरही जान्हवीचे पापा बोनी कपूर यांना मुलीच्या करिअरची चिंता सतावताना दिसतेय. ताज्या बातमीवरून तरी हेच दिसतेय. होय, अलीकडे बोनी कपूर जान्हवीच्या पीआर मॅनेजर्सशी भिडले. कारण काय तर म्हणे, सारा अली खान.

होय, जान्हवीच्या डेब्यूनंतर सैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिनेही ‘केदारनाथ’मधून डेब्यू केला. यापाठोपाठ तिचा दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ही रिलीज झाला. जो सुपरहिट ठरला. साहजिकच यानंतर जान्हवी व साराची तुलना सुरु झाली. केवळ इतकेच नाही तर दोघींच्या चाहत्यांमध्येही जुंपली. कदाचित या सगळ्यांमुळेच जान्हवीचे पापा बोनी कपूर यांची चिंता वाढली आहे. या सगळ्यांचे खापर बोनी कपूर यांनी जान्हवीने हायर केलेल्या पीआर कंपनीवर फोडले आहे.

जान्हवी सारापेक्षा पिछाडत असल्याचे बोनी कपूर यांचे निरीक्षण आहे आणि यामुळे लेकीच्या भविष्याची चिंता बोनी यांना आहे. एकंदर काय तर त्यांचा पीआर कंपनीवर निघालेला राग, याचाच परिपाक आहे.जान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या ती ईशान खट्टरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली. या चित्रपटातील जान्हवीच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले आणि पाठोपाठ तिला चित्रपटही मिळाले. येत्या काळात जान्हवी धर्मा प्रॉडक्शनच्याच ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटात दिसणार आहे.

२०२०मध्ये प्रदर्शित होणा-या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. हा चित्रपट संपण्याआधीच जान्हवीच्या तिस-या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. होय, सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिस-या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.