Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी ट्रम्पशी बोलायला तयार, त्यांना सांगा दादरला सिलेंडर घेऊन या...", डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणी चर्चेवर बोमन इराणींचा मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:54 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेसाठी स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि बोमन इराणी यांच्यासोबत चर्चा केल्याचे मीम्स व्हायरल झाले. या मीम्सवरुन बोमन इराणी यांनी मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. 

गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराणमधील युद्धाचे संपूर्ण जगभरात परिणाम जाणवू लागले आहेत. देशात एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी ट्रप्म आणि इराण यांच्यामध्ये चर्चाही सुरू आहेत. अशातच सोशल मीडियावर काही मीम्स व्हायरल झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेसाठी स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि बोमन इराणी यांच्यासोबत चर्चा केल्याचे मीम्स व्हायरल झाले. या मीम्सवरुन बोमन इराणी यांनी मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. 

बोमन इराणी व्हिडीओमध्ये म्हणतात की "सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे की डोनाल्ड ट्रम्प इराणींसोबत संवाद साधू इच्छितात. आणि त्यासाठी त्यांनी तीन लोकांना आमंत्रित केलं आहे. त्यामध्ये स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि बोमन इराणी अशी नावं आहेत. मी तयार आहे. शांततेसाठी मी काहीही करू शकतो. पण माझा एकच प्रॉब्लेम आहे की मी वॉशिंग्टनला येणार नाही. ट्रम्प साहेब जर दादारच्या पारसी कॉलनीत आले तर बरं होईल. त्यांना छान जेवण खाऊ घालू. कस्टर्ड खायला घालू. आणि ते जर एक सिलेंडर घेऊन आले तर सगळ्यांचं जीवन सुखी होईल". 

बोमन इराणींच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून फरहान अख्तर, जावेद जाफरी, तब्बू, इशिता अरुण या सेलिब्रिटींनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. बोमन इराणी खोसला का घोसला २ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Boman Irani's funny video on Trump's Iran talks goes viral.

Web Summary : Amidst global concerns over the Iran-Israel conflict and gas shortages, Boman Irani created a humorous video in response to memes suggesting Trump consults him on Iran. He jokingly invites Trump to Dadar for food, requesting he bring a gas cylinder.
टॅग्स :बोमन इराणीडोनाल्ड ट्रम्प