Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी आहेत शाकाहारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:58 IST

विशेषत: शाकाहाराचे महत्त्व लक्षात घेता काही सेलिब्रिटींनीही शाकाहाराचे पालन केले आहे. हे सेलिब्रिटी मांसाहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात.

शरीराबरोबरच निसर्गासाठी, पर्यावरणासाठी शाकाहार किती उपयुक्त आहे शिवाय शाकाहाराच्या महत्त्वाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून बहुतांश जणांनी शाकाहार अंगीकारला आहे. विशेषत: शाकाहाराचे महत्त्व लक्षात घेता काही सेलिब्रिटींनीही शाकाहाराचे पालन केले आहे. हे सेलिब्रिटी मांसाहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात. जाणून घेऊया त्या सेलिब्रिटींबाबत...

* जॉन अब्राहमबॉलिवूडचा मॉचोमॅन म्हणून ओळख असलेला जॉन अब्राहम स्वत: मांसाहार तर करत नाही, शिवाय इतरांनाही शाकाहारासाठी प्रेरित करत असतो. विशेषत: तरीही फिटनेसच्या बाबतीत जॉन मोठमोठ्या कलाकारांना मागे टाकतो.

* शाहिद कपूर२०१७ मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन मेन्स’ च्या यादीत अग्रस्थान पटकावलेला शाहिद कपूर मांसाहार करत नाही. त्याला ही प्रेरणा ‘लाइफ इज फेयर’ पुस्तकातून मिळाली होती. हे पुस्तक वाचल्यानंतर त्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. कोणतेही प्रोटीन सप्लिमेंट्स न घेता जास्तीत जास्त व्यायाम आणि शाकाहारवर तो भर देतो.  

* अमिताभ बच्चनबॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आज वयाच्या ७५ व्या वर्षीही अगदी तंदुरुस्त असून ते अजूनही तेवढ्याच उत्साहाने काम करत आहेत. बिग बीदेखील मांसाहार करत नाहीत. ते फक्त पौष्टिक आणि सकस आहाराला प्राधान्य देतात. त्यांना इडली सांबार खूप आवडतं. भेंडीची भाजी, मुगाची डाळ, पालक पनीर हे पदार्थ त्यांना आवडतात. दिवसभरात ते मोड आलेली कडधान्ये खातात.

* आमिर खानआमिर खान सुरुवातीला मांसाहारी होता पण काही वर्षांपूर्वीच त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडून दिलं. वयाच्या पन्नाशीचा टप्पा पार करून देखील आमिर फिटनेसच्या बाबतीत सर्वांवर मात करतो.

* आर. माधवनआपल्या अभिनय कौशल्याने तरूणींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता आर. माधवनही शाकाहारी आहे. माधवन देखील मांसाहार करत नाही आणि इतरांनाही मांसाहारी पदार्थ खाणे टाळण्याचा संदेश देतो.

टॅग्स :अमिताभ बच्चनजॉन अब्राहम