Join us  

'काही चित्रपट चालले नाही...', सिनेसृष्टीतून चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकवर किंग खान शाहरुखचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:25 AM

किंग खान शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा  किंग खान शाहरुख अनेक वर्षे चाहत्यांपासून दूर राहिला. पण जेव्हा त्यानं कमबॅक केलं, तेव्हा 3 बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर हिट्स देऊन त्याला 'बॉलिवुड किंग' का म्हटले जातं हे सिद्ध केलं. सध्या सोशल मीडियावर किंग खान शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिनेसृष्टीतून घेतलेल्या ब्रेकवर आणि कमबॅकवर तो बोलताना पाहायला मिळतोय. 

सलग फ्लॉप चित्रपट केले असल्याची कबुली देत ​​शाहरुख म्हणाला की, "कारण मी गेली ३३ वर्षे काम करत आहे आणि जेव्हा तू अचानक एवढा मोठा गॅप घेतोस, तेव्हा तू सहसा थोडं घाबरतेस. तुला वाटतं, अरे यार, मला योग्य चित्रपट निवडायचा आहे. त्याआधी काही चित्रपट होते. माझ्या काही चित्रपटांनी चांगले काम केले नाही. त्यामुळे मलाही असे वाटू लागले की मी चांगले चित्रपट बनवत नाही".

शाहरुख म्हणाला, "मी 33 वर्षांपासून काम करत आलो आणि मग एवढा मोठा ब्रेक घेतला. एका मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करताना थोडीशी धाकधूक वाढली होती. मी योग्य चित्रपट निवडला का असं वाटतं होतं. याआधी प्रदर्शित झालेल्या माझ्या काही सिनेमांनी चांगला व्यवसाय केला नव्हता. त्यामुळे मी चांगले चित्रपट बनवत नाहीये असं मला वाटतं होतं".

पुढे तो म्हणाला, "पठाण, जवाण आणि डंकीला लोकांनी प्रेम दिलं. आपल्या देशातील आणि बाहेरील लोकांनी मला त्यांच्या हृदयात ठेवलं आहे. चार वर्षांचा ब्रेक नको.  2-4 महिन्यांचा घेत जा असंही त्यांनी म्हटलं. मला मिळालेल्या प्रेमासाठी मी सर्वांचा आभारी आहे. त्यामुळेच मी जे काही करतोय ते योग्य करतोय आणि मी करत राहिलं पाहिजे, याची जाणीव मला झाली".

किंग खान शाहरुखसाठी वर्ष 2023 यशस्वी ठरलं. चार वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर शाहरुखने मोठ्या पडद्यावर 'पठाण' सिनेमातून पुनरागमन केलं. त्यानंतर जवान आणि डंकी प्रदर्शित झाले आणि तिन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. पठाण सिनेमाच्या आधी शाहरुखचा 'झिरो' हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर शाहरुख खान चित्रपटामध्ये दिसला नाही. 

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा