Vishal Dadlani:बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आणि गायक म्हणून विशाल ददलानीकडे पाहिलं जातं.ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस तसेच वॉर यांसारख्या कित्येक चित्रपटांना त्याने संगीत दिलं आहे. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. दरम्यान, सध्या हा गायक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच विशाल ददलानी,शेखर रवजियानी तसेच शान आणि गायिका नीती मोहन यांनी कपिल शर्माच्या 'ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली.यावेळी विशाल ददलानीने त्याच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग शेअर केला. ज्याबद्दल ऐकून अनेकांना धक्का बसला.
हास्य आणि विनोदाने रंगलेल्या या शोमध्ये विशाल दादलानीने त्यांच्या लाईव्ह परफॉर्मिंगच्या दिवसाच्या आठवणी शेअर केल्या. त्यावेळी लुधियानामध्ये एका लग्न समारंभातील लाईव्ह परफॉर्मन्सचा किस्सा सांगताना तो म्हणाला, "त्यावेळी प्रत्येकजण नशेत होता, नवरीचे बाबांची देखील तिच अवस्था होती.कोणीही शुद्धीत नव्हतं. त्याचवेळी अचानक नवरीचे वडील मला म्हणाले,की मी आज रात्री तुला मारून टाकेन.सुरुवातीला मला काहीच समजलं नाही.त्याचं ते बोलून मला मग मला धक्काच बसला. मग तो माणूस स्टेजवर आला आणि म्हणाला, 'तू आणि मी,आपण सर्वांना मारू'. तो हे सगळं नशेत बोलत होता." विशालचा हा किस्सा ऐकून शोमधील सगळेच लोटपोट हसू लागतात.
वर्कफ्रंट
विशाल ददलानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर विशाल-शेखर या जोडीने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेकसुपरहिट गाणी दिली आहेत. याशिवाय तो अनेक सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे.