Join us

डोक्यावर २५ लाखांचं कर्ज, तरी दिवसाला उडवतो १ लाख; २० हजार जेवणाचं बिल, कोण आहे हा बॉलिवूड सिंगर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:24 IST

दोन्ही भावांनी वडिलांचा वारसा पुढे चालवत बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केलं. अमालने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पर्सनल लाइफबद्दल भाष्य केलं. 

अरमान मलिकचा भाऊ अमाल मलिकही प्रसिद्ध आणि लोकप्रिय बॉलिवूड सिंगर आहे. अरमान आणि अमाल यांचे वडील डब्बू मलिकही लोकप्रिय संगीतकार होते. या दोन्ही भावांनी वडिलांचा वारसा पुढे चालवत बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केलं. अमालने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पर्सनल लाइफबद्दल भाष्य केलं. 

अमालने नुकतीच सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तो म्हणाला, "मी गाण्यावर पाण्यासारखे पैसे खर्च करतो. जर मला २० लाखांचं बजेट दिलं तर २५ लाख आणि ३० लाखांचं बजेट असेल तर ३५ लाख खर्च करतो. वरचे ५ लाख रुपये मी जास्त खर्च करतो. हे माझ्या आईला आवडत नाही. ती दक्षिण भारतीय कुटुंबातून येते. जिथे खूप बचत केली जाते. त्यामुळे कधी कधी बिल जास्त झालं तर मला ते आईपासून लपवावं लागतं". 

"तिला हे कधीच समजणार नाही की जेवणाचं बिल २० हजार रुपये का आलं? किंवा मी एका दिवसात १ लाख रुपये का खर्च केले. मी रोज एवढे पैसे उडवतो असं नाही. पण, कधी कधी मी माझ्या टीमला पार्टी देतो. बाहेर जेवायला घेऊन जातो. माझ्यासाठी पैसे म्हणजे फक्त एक माध्यम आहे. माझ्यावर जवळपास २५ लाखांचं कर्ज आहे. पण, यामुळे मला काहीच फरक पडत नाही. एका रात्रीत आणि एका परफॉर्मन्सने मी हे पैसे कमवू शकतो", असंही तो म्हणाला. 

टॅग्स :सेलिब्रिटी