Join us

मुस्लिम असल्याने गर्लफ्रेंडने केला ब्रेकअप,५ वर्षांचं नातं तोडलं! प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:08 IST

मुस्लिम धर्म असल्याने गर्लफ्रेंडने तोडलं नातं, गायकाने व्यक्त केलं दु:ख, म्हणाला...

Bollywood Singer Amaal Malik: प्रसिद्ध बॉलिवूड गायक व संगीतकार अमाल मलिक (Amaal Malik) हा मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अमालने आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे.  फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. अशातच अमाल त्याच्या गाण्यांसह स्पष्टोवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत येतो. सध्या एका मुलाखतीमध्ये त्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 

नुकतीच अमाल मलिकने 'सिद्धार्थ कन्नन'ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. या मुलाखतीमध्ये गायकाने त्याच्या लव्ह लाईफबद्दलही उघडपणे सांगितलं. ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने तो मुस्लिम असल्यामुळे नातं तोडलं, असा धक्कादायक खुलासा त्याने या मुलाखतीत केला. त्यावेळी अमाल म्हणाला, "मी पहिल्यांदाच असं उघडपणे माझ्या रिलेशनशिपविषयी बोलतो आहे. पण, मला वाटतं की हीच व्यक्त होण्याची योग्य वेळ आहे. कबीर सिंगमध्ये मी पहला प्यार गाण्यावर काम करत होतो आणि ती वेळ माझ्यासाठी खूप कठीण होती. कारण, तेव्हाच माझा ब्रेकअप झाला होता. ज्या मुलीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होतो ती दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करणार होती. "

त्यानंतर अमाल म्हणाला, "आम्ही २०१४-२०१९ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होतो. पण, तिच्या घरच्यांना आमचं नातं मान्य नव्हतं. ते धर्म आणि माझ्या प्रोफेशनच्या विरुद्ध होते. त्यांच्या मुलीने इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीला डेट केलेलं मान्य नव्हतं. त्यानंतर मग एके दिवशी एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान, तिने मला फोन करुन सांगितलं की ती लग्न करत आहे.ती माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करायलाही तयार होती पण त्यावेळी डीडीएलजेचा शाहरुख माझ्या आत जागा झाला. मी तिला म्हणालो, तुझे पालक जर माझ्या कामाचा आणि माझ्या धर्माचा आदर करू शकत नसतील तर मी तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा...". असा खुलासा अमालने मुलाखतीमध्ये केला 

अमाल मलिक हा गायक अरमान मलिकचा धाकटा भाऊ आहे. त्याचे वडील डब्बू मलिक हे देखील एक लोकप्रिय गायक आहेत. अमालने हिरो चित्रपटातील 'ओ खुदा' सारख्या अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. तसेच 'आशिक सरेंडर हुआ' ,'सूरज डूबा है', सोच ना सके, रोके ना रुकें नैना यांसारखी लोकप्रिय गाणी त्याने गायली आहेत. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी