Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलीवूडचा खिलाडी पडला प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 09:39 IST

वेल, कोणताही दुसरा तिसरा विचार मनात येण्याअगोदर हे सांगितलेच पाहिजे की, खिलाडी अक्षय कुमार नेमका कुणाच्या प्रेमात पडलाय ते! ...

वेल, कोणताही दुसरा तिसरा विचार मनात येण्याअगोदर हे सांगितलेच पाहिजे की, खिलाडी अक्षय कुमार नेमका कुणाच्या प्रेमात पडलाय ते! टिवंकल खन्ना आणि दोन गुणी मुलं असतांना आता तो कोणाच्या प्रेमात पडेल हो? तरीही तो पडलाय न्यूयॉर्क सिटीच्या प्रेमात. हुश्श...आता तुम्हाला वाटेल एवढेच ना मग ठीक आहे.नुकताच अक्षय न्यूयॉर्क सिटीत ‘रूस्तुम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याला हे शहर अत्यंत आवडले. येथे असलेले विविध ठिकाणं खुपच सुंदर असून तो भविष्यात येथे येऊन स्थायिक होण्याचा विचार करतोय.त्याने एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ लाईक आॅल गुड थिंग्ज, धीस हॉलीडे टू हॅज कम टू अ‍ॅन एंड ! बिडींग गुडबाय टू न्यूयॉर्क विथ द लिटील वन, अनटील नेक्स्ट टाईम...’