Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! वयाच्या 47 व्या वर्षी Kajol होणार आई? जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 12:39 IST

Kajol Video : होय,काजोलचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यानंतर भलतीच चर्चा सुरू झाली.

प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री काजोल (Kajol) प्रेग्नंट आहे, तिसऱ्या मुलाची आई होणार आहे, ही बातमी तुमच्याही कानावर आली असेल तर शॉक्ड होण्याची गरज नाही. कारण आता या व्हायरल बातमीमागचं सत्य समोर आलं आहे.

काजोलचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि यानंतर भलतीच चर्चा सुरू झाली. होय, काजोल तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा यानंतर रंगली.

  करण जोहरचा मित्र अपूर्व मेहताच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत काजोलने हजेरी लावली. यावेळी काजोल ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली.  तेव्हाचाच हा व्हिडीओ. हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. हाच व्हिडीओ पाहिला आणि नेटकºयांनी काजोल प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न विचारायला सुरूवात केली. ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला.

 काय आहे सत्य?तुम्हीही काजोलचा हा व्हिडीओ पाहिला असेल आणि तुम्हीही काजोलला पाहून कन्फ्युज असाल तर जरा थांबा. कारण काजोल प्रेग्नंट नाही. तिने घातलेल्या ड्रेसमध्ये तिचं सुटलेलं पोट दिसलं आणि ते पाहून काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ती प्रेग्नंट आहे, असा अंदाज बांधला. पण तसं काहीही नाही. काजोल प्रेग्नंट असल्याच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. तिला युग आणि न्यासा अशी दोन मुलं आहेत आणि आपल्या संसारात ती आनंदी आहे.

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी काजोलने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू सिनेमा 'बेखुदी' होता. काजोल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. काजोलला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. 

टॅग्स :काजोल