Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मागे टाकतील अशा आहेत ‘या’ बंगाली अभिनेत्रीच्या अदा !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 18:15 IST

नुकतेच एका बंगाली अभिनेत्रीने जे फोटोशूट केले आहे, ते पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हाल, यात काही शंका नाही. तुम्ही म्हणाल कोण आहे ती?

बॉलिवूडच्या अभिनेत्री कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने वेगवेगळे फोटोशूट करतच असतात. त्यातून त्यांच्या सदाबहार अदा आपण पाहतोच. चाहते त्यांच्या अदांवर दिलखुलासपणे प्रेम करतात. मात्र, आता हेच बघा ना, नुकतेच एका बंगाली अभिनेत्रीने जे फोटोशूट केले आहे, ते पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हाल, यात काही शंका नाही. तुम्ही म्हणाल कोण आहे ती? होय, ती म्हणजे प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ होय.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकतंच नवीन फोटोशूट केलं आहे.  हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुसरत जहाँ या अभिनेत्री असण्यासोबतच तृणमूल काँग्रेसच्या खासदार देखील आहेत.  शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या प्रचंड सुंदर दिसत आहेत. अनेक वेळा त्या सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करत असतात. नुसरत जहाँ यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्यासोबत लग्न केलं आहे. 

पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहां लग्नबेडीत अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये लग्नगाठ बांधली. सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला. नव्या सरकारचं पहिलं संसदीय सत्र १७ जूनला होतं. यात नव्याने खासदार झालेल्यांनी शपथ घेतली. मात्र त्यावेळी नुसरत टर्कीमध्ये प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये व्यग्र होत्या.

टॅग्स :बॉलिवूडबांग्ला देश