Sushmita Sen: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. सुष्मिता सेनने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकून तिने जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली होती. या घटनेला आता जवळपास ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोंमध्ये सुष्मिता सेनचीही झलक दिसते. दरम्यान, त्यावेळचे सुंदर क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
नुकतीच सुष्मिता सेनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, "२१ मे १९९४ एका १८ वर्षांच्या भारतीय मुलीला जगाची ओळख करून देणारा ऐतिहासिक दिवस. माझ्यासाठी भावनांचे जग उघडणे, आशेची शक्ती, एकमेकांना सामावून घेण्याची शक्ती या गोष्टींची जाणीव झाली. यानिमित्ताने जगभर प्रवास करुन आणि सर्वात प्रेरणादायी लोकांना भेटण्याचा सौभाग्य लाभणं निश्चितच एक जीवन समृद्ध करणारा अनुभव होता."
त्यानंतर या खास पोस्टद्वारे सुष्मिताने परमेश्वराचे तसेच तिच्या पालकांचे आभार मानले. त्याबद्दल तिने लिहिलंय की, 'परमेश्वराचे, आई आणि बाबांचे मनापासून धन्यवाद .' मिस युनिव्हर्समध्ये भारताच्या पहिल्या विजयाच्या ३१ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान, मी नेहमीच अभिमानाने जपून ठेवेन...", अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
सुश्मिता सेनचा हे फोटो ९० च्या दशकात घेऊन जाणारे आहेत. त्यात तिचं सौंदर्य, चेहऱ्यावरची निरागसता सगळंच खूप अप्रतिम दिसतंय. सुश्मिताने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर अभिनयात पदार्पण केलं. सुश्मिता सेनने १९९६ मध्ये आलेल्या दस्तक या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 'बीवी नंबर 1',मै हूँ ना','मैने प्यार क्यू किया' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं.