Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो; चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 17:24 IST

काही कलाकार हे त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात दीपिका पादुकोणही मागे नाही. तिने नुकताच एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

कलाकार कितीही मोठे स्टार झाले तरीही प्रत्येकाच्या आयुष्यातील असे काही क्षण असतात जे त्यांना पुन्हा पुन्हा जगावे वाटतात. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनाही त्यांचे बालपण हे खूपच प्रिय असते. आता हेच बघा ना, काही कलाकार हे त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर क रत असतात. यात दीपिका पादुकोणही मागे नाही. तिने नुकताच एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी वेगवेगळया प्रतिक्रिया दिल्या आहेत.                    

        

बॉलिवूडमध्ये सध्या थ्रोबॅक पिक्चर असा ट्रेंड सुरू आहे. अनेक कलाकार #थ्रोबॅक पिक्चर असा हॅशटॅग वापरुन आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आतापर्यंत रणवीर सिंग, इलियाना डिक्रूज, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी, विकी कौशल यांसारख्या अनेक कलाकारांनी आपले थ्रोबॅक पिक्चर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हे नाव जोडले गेले आहे. तिने नुकताच आपल्या बालपणीचा एक फोटो इन्स्टग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोत दीपिकाने पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. खास मैत्रिणीसोबत दीपिकाने काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याआधी तिचा करिना कपूर व जॉन अब्राहम सोबत काढलेला एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सध्या दीपिका ‘छपाक’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची कथा अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट येत्या १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणसोशल मीडिया