Join us

२ तास १३ मिनिटांचा हॉरर सिनेमा; सीन्स पाहून चुकेल हृदयाचा ठोका;  एकटे पाहण्याची चूक करू नका नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:16 IST

ओटीटीवरील ट्रेंडिंग हॉरर सिनेमा; एकटे पाहण्याची वाटेल भीती

OTT Horror Movies: ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आजकाल प्रेक्षकांची कॉमेडी, रोमॅन्टिक चित्रपटांसह हॉरर चित्रपट पाहण्याची क्रेझही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे दिग्दर्शक देखील हॉरर चित्रपटांची निर्मिती करत आहेत. 'भूल भुलैया-३ ', 'शैतान', 'मुंज्या', 'स्त्री-२' यांसारख्या हॉरर चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तुम्हालाही जर हॉरर चित्रपट पाहणं आवडत असेल तर अलिकडेच प्रदर्शित झालेला एक बहुचर्चित चित्रपट नक्की पाहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर भीतीने थरकाप उडेल. जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल...

अलिकडेच बरेच लोक हॉरर चित्रपटांचे शौकीन झाले आहेत. अशातच ओटीटीवर अशाच एका चित्रपटाची चर्चा आहे. अभिनेत्री काजोलची मुख्य भूमिका असलेला 'माँ' सिनेमा २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी कलाकरांच्या कामाचं कौतुक केलं होतं. या चित्रपटात एका आईची कहाणी दाखवण्यात आली आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ही आई वाईट शक्तींविरुद्ध लढते. २२ ऑगस्टला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. राक्षस आणि दैवीशक्तीची ही आजच्या युगातील कथा अखेरपर्यंत खिळवून ठेवते. आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते त्याचे यथार्थ चित्रण चित्रपटात आहे.या चित्रपटातील काही दृश्ये ही धडकी भरवणारी आहेत. त्यामुळे तुम्ही हा चित्रपट एकट्याने पाहू शकत नाही.

'माँ' या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केलं आहे. या चित्रपटात काजोलसोबतसिनेमात रोनित रॉय आणि इंद्रनील गुप्ता हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

 

टॅग्स :काजोलबॉलिवूडसिनेमा