Actress Farheen Khan: हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळण्यासाठी नशीब असावे लागतं असं म्हणतात. नशीबाने दगा दिला तर हे कलाविश्व निष्ठूर होत एखाद्याला प्रवाहातून कसे बाहेर फेकतं याची अनेक उदाहरणे समोर आहेत. बऱ्याचदा रुपेरी पडद्यावर अनेक कलाकार परिचित चेहऱ्याचे असूनही त्यांचं नाव देखील बऱ्याच सिनेरसिकांना माहिती नसतं. नंतर चित्रपटसृष्टीत काम बंद केल्यावर हे कलाकार विस्मृतीत जातात. ९० च्या दशकातील एक अशीच एक अभिनेत्री होती. एका चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली.या अभिनेत्रीचं हसणं आणि चेहरा हुबेहुब अगदी माधुरी दीक्षितसारखा होता. त्यामुळे या अभिनेत्रीला सगळे छोटी माधुरी म्हणू लागले. या अभिनेत्रीचं नाव आहे फरहीन खान.
फरहीन खान तिच्या फिल्मी करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. फरहीनचा पहिला सिनेमा १९९२ साली आला होता,जान तेरे नाम.. असंं या सिनेमाचं नाव होतं.हा सिनेमा चांगलाच गाजला. एकीकडे यशाचं शिखर चढत असतांना तिने हिंदू क्रिकेटरसोबत लग्नगाठ बांधली. मनोज प्रभाकर असं त्यांच नाव होतं. त्याआधीच तिला पहिल्या पतीपासून मूल होतं अशाही चर्चा होत्या. रिपोर्ट्सनुसार,मनोज फरहीनच्या प्रेमात पडला होता.त्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी लग्न केलं.
५ वर्षात १७ सिनेमांमध्ये केलं काम
एकीकडे माधुरी दीक्षित, दिव्या भारती आणि काजोल, रवीना टंडन या अभिनेत्रींची चलती होती. त्यात ही अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त फरहीन खानने कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ती'बिंदिया' नावाने प्रसिद्ध होती. फरहीन आणि मनोज दोघेही त्यांच्या सुखी संसारात रमले आहेत त्यांना दोन मुले देखील आहेत.राहिल आणि मनवंश अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. सध्या फरहीन आणि मनोज दोघेही लाईमलाईटपासून दूर दिल्लीत राहतात.