Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा झाला! अभिनेत्री इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:38 IST

"मन आनंदाने भरून आलंय...", इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा झाली आई; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज 

Ileana D'cruz : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D'cruz) चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. इलियाना दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तिने १९ जून रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. जवळपास दीड महिन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज शेअर केली आहे. इतकंच नाही तर इलियानाने या पोस्टद्वारे तिच्या लेकाची खास झलक दाखवत नावही जाहीर केलं आहे.

इलियाना डिक्रुझने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ती दुसऱ्यांदा आई झाल्याचं सांगितलं आहे. "मन आनंदाने भरून आलंय...", असं म्हणत इलियानाने या बाळाचा पहिला फोटो शेअर केला. सोबतच बाळाचं नाव कोआनु रॅफे डोलन असं असल्याचंही तिने जाहीर केलं. दरम्यान, इलियानाची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अलिकडेचऑक्टोबर महिन्याच्या फोटोत तिने प्रेग्नंसी कीट दाखवत पुन्हा गरोदर असल्याची हिंट दिली होती. आता तशीच हिंट तिने पु्न्हा आणखी एक फोटो शेअर करत दिली आहे. इलियाना ३८ वर्षांची आहे. २०२३ मध्ये तिने गोंडस मुलाला जन्म दिला. तोवर तिने मुलाचे वडील कोण हे रिव्हील केलंच नव्हतं. त्यामुळे इलियाना लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्याच्या चर्चा होत्या. नंतर तिने पतीचा चेहरा दाखवला. इलियानाने २०२४ मध्ये मायकल डोलनसोबत लग्न केलं. आता ते दोघंही दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत.

टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया